English

खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विषयी माहिती लिहा: (अ) स्थापना (ब) ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेले अधिकार (क) वखाराच प्रशासन

Advertisements
Advertisements

Question

खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विषयी माहिती लिहा:

(अ) स्थापना

(ब) ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेले अधिकार

(क) वखाराच प्रशासन

Very Long Answer
Advertisements

Solution

(अ) स्थापना: ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ३१ डिसेंबर १६०० रोजी झाली. इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला.

(ब) ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेले अधिकार:

१६२३ मध्ये Charles II यांनी ईस्ट इंडिया कंपनीला पुढील अधिकार दिले:

  • चुकीचे वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार.
  • पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची मक्तेदारी.
  • पूर्वेकडील प्रदेशात किल्ले बांधण्याचा अधिकार.
  • सैन्य ठेवण्याचा अधिकार.
  • ख्रिश्चन नसलेल्या राज्यकर्त्यांशी तह करण्याचा अधिकार.

(क) वखाराच प्रशासन:

  1. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात कंपनीची व्यापारी केंद्रे पूर्वेकडे चेन्नई (मद्रास) आणि पश्चिमेकडे सुरत येथे होती.
  2. बंगाल, ओडिशा आणि इतर पूर्वेकडील प्रदेशांवरील व्यापाराची जबाबदारी कंपनीकडे होती.
  3. सुरत केंद्राच्या नियंत्रणाखाली पर्शियन आखातातील बसरा, लाल समुद्रावरील येमेनमधील मोखा बंदर आणि महाराष्ट्रातील राजापूर येथील वखारी होत्या.
  4. सुरतेच्या वखारीत एक हिशेबनीस, एक कोठारप्रमुख, एक खजिनदार, काही वखारदार, कारकून असत.
  5. याशिवाय त्यांच्या जोडीला धर्मगुरू, सर्जन व मदतनीस, स्वयंपाकी, प्रेसिडेंटचा नोकर, एक तुतारीवाला असे लोक असत.
  6. शिकाऊ उमेदवार ते प्रेसिडेंट सर्वजण वखारीत राहत होते आणि त्यांना कार्यालयातील भोजनगृहातून अन्न पुरवले जात होते.
  7. कंपनीने भारतात किल्ले बांधण्यास सुरुवात केली.
  8. चेन्नई येथे टांकसाळही स्थापन करण्यात आली. या टांकसाळीत ब्रिटिश सरकारसाठी सोने, चांदी, तांबे आणि मिश्रधातूंची नाणी तयार केली जात होती.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×