Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.
भौगोलिक शोध व शोधकांची माहिती लिहाः
(अ) ख्रिस्तोफर कोलंबस
(ब) अमेरिगो वेस्पुसी
(क) वास्को-द-गामा
Very Long Answer
Advertisements
Solution
(अ) ख्रिस्तोफर कोलंबस:
- १४५३ मध्ये तुर्कांनी इस्तंबूल (कॉन्स्टॅन्टिनोपल) जिंकले. ते पूर्व रोमन (बायझंटाईन) साम्राज्याची राजधानी होते.
- त्यामुळे युरोपियन राष्ट्रांना पूर्वेकडील सागरी मार्गाचा वापर करता येईना. म्हणून आशियात जाण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली.
- स्पेनचा राजा फर्दिनांद आणि राणी इसाबेल यांच्या पाठिंब्याने कोलंबस भारताच्या शोधात निघाला.
- पृथ्वी गोल आहे, त्यामुळे पश्चिमेकडे प्रवास केल्यास भारत सापडेल येईल, अशी खात्री त्याला होती. परंतु प्रत्यक्षात मात्र तो अमेरिका खंडाजवळ पोचला.
(ब) अमेरिगो वेस्पुसी:
- अमेरिगो वेस्पुसी हा इटालियन दर्यावर्दी होता. १४९७ मध्ये स्पेनच्या राजाच्या आदेशावरून त्याने मोहिम हाती घेतली.
- त्याने शोधलेल्या प्रदेशाला ‘व्हेनेझुएला’ असे नाव देण्यात आले.
- तिसऱ्या मोहिमेत नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेत त्याने ‘ॲमेझॉन’ नदीच्या मुखाच प्रदेश शोधला.
- अमेरिकेला ‘अमेरिका’ हे नाव अमेरिगोवरूनच पडल्याचे मानले जाते.
(क) वास्को-द-गामा:
- कॉन्स्टॅन्टिनोपलच्या पतनानंतर भारताकडे जाणारा सागरी मार्ग शोधण्याची स्पर्धा सुरू झाली. यात वास्को-द-गामा हा प्रमुख दर्यावर्दी मानला जातो.
- १४९७ मध्ये ४ जहाजे आणि १७० खलाशी घेऊन वास्को-द-गामा हा पोर्तुगीज दर्यावर्दी भारताकडे निघाला.
- आफ्रिकेच्या प्रवासात ‘मालिंदी’ या बंदराच्या भागातील एका भारतीय वाटाड्याबरोबर वास्को-द-गामा कालिकत (कोझीकोडे) बंदरात १४९८ साली पोचला.
- समुद्रमार्गाने भारतात पोहोचणारा तो पहिला युरोपियन होता.
- त्याने कालिकतचा राजा झामोरीन याच्याकडे व्यापाराची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यावर तो पोर्तुगालला परतला.
- गोवा आणि कोची येथे पोर्तुगिजांचे राज्य स्थापन झाल्यानंतर तो पहिला व्हाईसरॉय झाला.
- युरोपीय देश आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध त्याच्या प्रयत्नातून सुरू झाले.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
