हिंदी

खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा. भौगोलिक शोध व शोधकांची माहिती लिहाः (अ) ख्रिस्तोफर कोलंबस (ब) अमेरिगो वेस्पुसी (क) वास्को-द-गामा

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.

भौगोलिक शोध व शोधकांची माहिती लिहाः

(अ) ख्रिस्तोफर कोलंबस

(ब) अमेरिगो वेस्पुसी

(क) वास्को-द-गामा

विस्तार में उत्तर
Advertisements

उत्तर

(अ) ख्रिस्तोफर कोलंबस:

  • १४५३ मध्ये तुर्कांनी इस्तंबूल (कॉन्स्‍टॅन्टिनोपल) जिंकले. ते पूर्व रोमन (बायझंटाईन) साम्राज्याची राजधानी होते.
  • त्यामुळे युरोपियन राष्ट्रांना पूर्वेकडील सागरी मार्गाचा वापर करता येईना. म्हणून आशियात जाण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली.
  • स्‍पेनचा राजा फर्दिनांद आणि राणी इसाबेल यांच्या पाठिंब्‍याने कोलंबस भारताच्या शोधात निघाला.
  • पृथ्वी गोल आहे, त्यामुळे पश्चिमेकडे प्रवास केल्यास भारत सापडेल येईल, अशी खात्री त्याला होती. परंतु प्रत्यक्षात मात्र तो अमेरिका खंडाजवळ पोचला.

(ब) अमेरिगो वेस्पुसी:

  • अमेरिगो वेस्‍पुसी हा इटालियन दर्यावर्दी होता. १४९७ मध्ये स्पेनच्या राजाच्या आदेशावरून त्याने मोहिम हाती घेतली.
  • त्याने शोधलेल्या प्रदेशाला ‘व्हेनेझुएला’ असे नाव देण्यात आले.
  • तिसऱ्या मोहिमेत नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेत त्याने ‘ॲमेझॉन’ नदीच्या मुखाच प्रदेश शोधला.
  • अमेरिकेला ‘अमेरिका’ हे नाव अमेरिगोवरूनच पडल्याचे मानले जाते.

(क) वास्को-द-गामा:

  • कॉन्स्‍टॅन्टिनोपलच्या पतनानंतर भारताकडे जाणारा सागरी मार्ग शोधण्याची स्पर्धा सुरू झाली. यात वास्को-द-गामा हा प्रमुख दर्यावर्दी मानला जातो.
  • १४९७ मध्ये ४ जहाजे आणि १७० खलाशी घेऊन वास्‍को-द-गामा हा पोर्तुगीज दर्यावर्दी भारताकडे निघाला.
  • आफ्रिकेच्या प्रवासात ‘मालिंदी’ या बंदराच्या भागातील एका भारतीय वाटाड्याबरोबर वास्को-द-गामा कालिकत (कोझीकोडे) बंदरात १४९८ साली पोचला.
  • समुद्रमार्गाने भारतात पोहोचणारा तो पहिला युरोपियन होता.
  • त्याने कालिकतचा राजा झामोरीन याच्याकडे व्यापाराची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्‍यावर तो पोर्तुगालला परतला.
  • गोवा आणि कोची येथे पोर्तुगिजांचे राज्‍य स्‍थापन झाल्यानंतर तो पहिला व्हाईसरॉय झाला.
  • युरोपीय देश आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध त्याच्या प्रयत्नातून सुरू झाले.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×