हिंदी

खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विषयी माहिती लिहा: (अ) स्थापना (ब) ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेले अधिकार (क) वखाराच प्रशासन - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विषयी माहिती लिहा:

(अ) स्थापना

(ब) ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेले अधिकार

(क) वखाराच प्रशासन

विस्तार में उत्तर
Advertisements

उत्तर

(अ) स्थापना:

  1. ईस्‍ट इंडिया कंपनीची स्‍थापना ३१ डिसेंबर १६०० रोजी झाली.
  2. भारत आणि पूर्वेकडील आशियाई राष्ट्रांशी व्यापार करण्याच्या उद्देशाने या कंपनीची स्थापना झाली.
  3. इंग्‍लंडच्या एलिझाबेथ राणीने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला.

(ब) ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेले अधिकार:

  1. कंपनीतील नोकरवर्गाला शिक्षा करणे.
  2. पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे.
  3. पुर्वेकडील देशांत किल्ले बांधणे.
  4. संरक्षणासाठी व युद्धासाठी सैन्य बाळगणे.
  5. अन्य धर्मीयांशी युदूध वा तह करणे.

(क) वखाराच प्रशासन:

  1. १७ व्या शतकाच्या उत्‍तरार्धात कंपनीचा कारभार सुरत आणि चेन्नई (मद्रास) येथून चालत असे.
  2. चेन्नईच्या कार्यकक्षेत भारताचा पूर्वकिनारा, ओडिशा, बंगाल आणि पूर्वेकडील इतर देश होते.
  3. सुरतेच्या कार्यकक्षेत महाराष्‍ट्रातील राजापूर, तांबड्या समुद्रातील मोखा, पर्शियन आखातातील बसरा येथील वखारी होत्या.
  4. सुरतेच्या वखारीत एक हिशेबनीस, एक कोठारप्रमुख, एक खजिनदार, काही वखारदार, कारकून असत.
  5. या पदाधिकाऱ्यांच्या जोडीला धर्मगुरु, सर्जन व मदतनीस, स्‍वयंपाकी, प्रेसिडेंटचा नोकर, एक तुतारीवाला असे लोक असत.
  6. प्रत्‍यक्ष वखारीत काम करणाऱ्या इंग्रजांमध्ये शिकाऊ उमेदवार (ॲप्रेंटिस), कारकून आणि फॅक्‍टर असे हुद्दे होते. शिकाऊ उमेदवार ते प्रेसिडेंट सगळे वखारीच्या आवारात राहत असत. तेथे भोजनाची सोय होती.
  7. कंपनीने संरक्षणासाठी किल्‍ले बांधण्याचे धोरण सुरू केले.
  8. मुंबईत इंग्रजांनी टांकसाळ सुरू करून चांदी, तांबे आणि जस्त या धातूंची नाणी पाडण्यास सुरुवात केली.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×