Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विषयी माहिती लिहा:
(अ) स्थापना
(ब) ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेले अधिकार
(क) वखाराच प्रशासन
सविस्तर उत्तर
Advertisements
उत्तर
(अ) स्थापना: ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ३१ डिसेंबर १६०० रोजी झाली. इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला.
(ब) ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेले अधिकार:
१६२३ मध्ये Charles II यांनी ईस्ट इंडिया कंपनीला पुढील अधिकार दिले:
- चुकीचे वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार.
- पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची मक्तेदारी.
- पूर्वेकडील प्रदेशात किल्ले बांधण्याचा अधिकार.
- सैन्य ठेवण्याचा अधिकार.
- ख्रिश्चन नसलेल्या राज्यकर्त्यांशी तह करण्याचा अधिकार.
(क) वखाराच प्रशासन:
- १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात कंपनीची व्यापारी केंद्रे पूर्वेकडे चेन्नई (मद्रास) आणि पश्चिमेकडे सुरत येथे होती.
- बंगाल, ओडिशा आणि इतर पूर्वेकडील प्रदेशांवरील व्यापाराची जबाबदारी कंपनीकडे होती.
- सुरत केंद्राच्या नियंत्रणाखाली पर्शियन आखातातील बसरा, लाल समुद्रावरील येमेनमधील मोखा बंदर आणि महाराष्ट्रातील राजापूर येथील वखारी होत्या.
- सुरतेच्या वखारीत एक हिशेबनीस, एक कोठारप्रमुख, एक खजिनदार, काही वखारदार, कारकून असत.
- याशिवाय त्यांच्या जोडीला धर्मगुरू, सर्जन व मदतनीस, स्वयंपाकी, प्रेसिडेंटचा नोकर, एक तुतारीवाला असे लोक असत.
- शिकाऊ उमेदवार ते प्रेसिडेंट सर्वजण वखारीत राहत होते आणि त्यांना कार्यालयातील भोजनगृहातून अन्न पुरवले जात होते.
- कंपनीने भारतात किल्ले बांधण्यास सुरुवात केली.
- चेन्नई येथे टांकसाळही स्थापन करण्यात आली. या टांकसाळीत ब्रिटिश सरकारसाठी सोने, चांदी, तांबे आणि मिश्रधातूंची नाणी तयार केली जात होती.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
