मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा. १९४२ च्या ‘चलेजाव’ आंदोलनाची माहिती लिहा: (अ) मुंबई अधिवेशन (ब) महात्मा गांधीजींचे आवाहन (क) आंदोलनाचे परिणाम - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.

१९४२ च्या ‘चलेजाव’ आंदोलनाची माहिती लिहा:

(अ) मुंबई अधिवेशन

(ब) महात्मा गांधीजींचे आवाहन

(क) आंदोलनाचे परिणाम

सविस्तर उत्तर
Advertisements

उत्तर

राष्ट्रीय सभेने ८ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिश सरकारला ‘चले जाव’ चा आदेश दिल्यावर भारतभर जी चळवळ सुरू झाली, तिला ‘चले जाव’ चळवळ असे म्हणतात.

(अ) मुंबई अधिवेशन:

  1. राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे ‘छोडो भारत’ (भारत छोडो) हा ठराव मंजूर केला.
  2. ७ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले.
  3. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ८ ऑगस्ट रोजी मांडलेला ‘चले जाव’ ठराव प्रचंड बहुमताने संमत झाला.
  4. या अधिवेशनात गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यांनी जनतेला ‘करो या मरो’ हा मंत्र दिला.

(ब) महात्मा गांधीजींचे आवाहन:

  1. ८ ऑगस्ट १९४२ रोजी राष्ट्रीय सभेने मुंबई अधिवेशनात ‘ब्रिटिशांनी तत्काळ भारत सोडावा’ अशी मागणी केली.
  2. गांधीजींनी जनतेला आवाहन केले की, हे आंदोलन केवळ राष्ट्रीय सभेचे नसून ते सर्व भारतीयांचे आहे.
  3. प्रत्येक स्त्री-पुरुषाने या क्षणापासून आपण स्वतंत्र आहोत असे मानून लढ्यासाठी सिद्ध व्हावे.
  4. ‘करेंगे या मरेंगे’ (करो या मरो) ही आपली सर्वांची प्रतिज्ञा असली पाहिजे.
  5. या स्वातंत्र्य-प्रतिज्ञेसाठी सर्वांनी प्रसंगी बलिदानाची तयारी ठेवावी.

(क) आंदोलनाचे परिणाम:

  1. चळवळ:
    1. गांधीजींच्या आवाहनाने संपूर्ण देशात नवचैतन्य निर्माण झाले.
    2. आंदोलन दडपण्यासाठी सरकारने ९ ऑगस्टच्या पहाटेच मौलाना आझाद, महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल यांसारख्या प्रमुख नेत्यांना अटक करून तुरुंगात डांबले.
    3. सरकारने सभा, मोर्चे, भाषणे आणि निदर्शने यांवर कडक बंदी घातली.
    4. सरकारी आदेश धुडकावून लावत जनतेने अत्यंत धैर्याने ही चळवळ पुढे नेली.
    5. देशात ठिकठिकाणी भूमिगत आंदोलने सुरू झाली आणि स्थानिक पातळीवर क्रांतिकारी गट सक्रिय झाले.
    6. आंदोलनासाठी गुप्त रेडिओ केंद्रे चालवली गेली आणि काही ठिकाणी प्रतिसरकारांची स्थापना झाली.
  2. परिणाम:
    1. या व्यापक जन आंदोलनामुळे ब्रिटिश सत्तेचा भारतातील पाया खिळखिळा झाला.
    2. यापुढे भारतात आपली सत्ता दीर्घकाळ टिकवता येणार नाही, याची स्पष्ट जाणीव ब्रिटिश सरकारला झाली.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×