मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा. राज्यांच्या पुनर्रचनेविषयी माहिती लिहा: (अ) झारखंड (ब) तेलंगणा (क) उत्तराखंड

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.

राज्यांच्या पुनर्रचनेविषयी माहिती लिहा:

(अ) झारखंड

(ब) तेलंगणा

(क) उत्तराखंड

सविस्तर उत्तर
Advertisements

उत्तर

(अ) झारखंड:

  • झारखंड राज्याच्या निर्मितीसाठी पहिली निदर्शने १९२९ मध्ये झाली.
  • १९४७ मध्ये ‘अखिल भारतीय झारखंड पार्टी’ ची स्थापना झाल्यानंतर स्वतंत्र झारखंड राज्याच्या मागणीला वेग आला.
  • १९७३ मध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले.
  • १९९४ मध्ये बिहार विधानसभेने ‘झारखंड विकास स्वायत्त मंडळ (JAAC)’ स्थापनेचे विधेयक मंजूर केले.
  • ऑगस्ट २००० मध्ये लोकसभेने बिहारचे विभाजन करून स्वतंत्र झारखंड राज्य निर्माण करण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले.
  • १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.

(ब) तेलंगणा:

  • तेलंगणा हा आंध्र प्रदेश राज्याचा या महत्त्वाचा भाग होता. तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आली.
  • ‘तेलंगणा राष्ट्रीय समिती’ ने स्वतंत्र तेलंगणा राज्यासाठी चळवळ सुरू केली.
  • २००१ मध्ये भारत सरकारने तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची घोषणा केली.
  • २०१४ मध्ये संसदेत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
  • २ जून २०१४ रोजी तेलंगणा हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.

(क) उत्तराखंड:

  • ढवाल व कुमाऊँ भागातील जनतेने १९३० मध्येच उत्तराखंड राज्याची मागणी केली होती.
  • १९३८ च्या काँग्रेस अधिवेशनात त्याला पाठिंबा देण्यात आला.
  • स्वातंत्र्योत्तर काळात फाजल अली आयोगाने उत्तराखंड राज्याची मागणी फेटाळली.
  • १९५७ मध्ये स्थानिक लोकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले.
  • १९७३ मध्ये ‘उत्तराखंड पर्वतीय राज्य परिषद’ ची स्थापना करण्यात आली.
  • १९९४ मध्ये या आंदोलनाला अधिक तीव्र झाले.
  • लोकांच्या भावनेची दखल घेऊन उत्तरप्रदेश राज्याच्या विधानसभेत स्वतंत्र राज्याचा ठराव संमत करण्यात आला.
  • अखेरीस २००० मध्ये उत्तरांचल (सध्याचे उत्तराखंड) या स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×