Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.
राज्यांच्या पुनर्रचनेविषयी माहिती लिहा:
(अ) झारखंड
(ब) तेलंगणा
(क) उत्तराखंड
Very Long Answer
Advertisements
Solution
(अ) झारखंड:
- झारखंड राज्याच्या निर्मितीसाठी पहिली निदर्शने १९२९ मध्ये झाली.
- १९४७ मध्ये ‘अखिल भारतीय झारखंड पार्टी’ ची स्थापना झाल्यानंतर स्वतंत्र झारखंड राज्याच्या मागणीला वेग आला.
- १९७३ मध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले.
- १९९४ मध्ये बिहार विधानसभेने ‘झारखंड विकास स्वायत्त मंडळ (JAAC)’ स्थापनेचे विधेयक मंजूर केले.
- ऑगस्ट २००० मध्ये लोकसभेने बिहारचे विभाजन करून स्वतंत्र झारखंड राज्य निर्माण करण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले.
- १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.
(ब) तेलंगणा:
- तेलंगणा हा आंध्र प्रदेश राज्याचा या महत्त्वाचा भाग होता. तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आली.
- ‘तेलंगणा राष्ट्रीय समिती’ ने स्वतंत्र तेलंगणा राज्यासाठी चळवळ सुरू केली.
- २००१ मध्ये भारत सरकारने तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची घोषणा केली.
- २०१४ मध्ये संसदेत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
- २ जून २०१४ रोजी तेलंगणा हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.
(क) उत्तराखंड:
- ढवाल व कुमाऊँ भागातील जनतेने १९३० मध्येच उत्तराखंड राज्याची मागणी केली होती.
- १९३८ च्या काँग्रेस अधिवेशनात त्याला पाठिंबा देण्यात आला.
- स्वातंत्र्योत्तर काळात फाजल अली आयोगाने उत्तराखंड राज्याची मागणी फेटाळली.
- १९५७ मध्ये स्थानिक लोकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले.
- १९७३ मध्ये ‘उत्तराखंड पर्वतीय राज्य परिषद’ ची स्थापना करण्यात आली.
- १९९४ मध्ये या आंदोलनाला अधिक तीव्र झाले.
- लोकांच्या भावनेची दखल घेऊन उत्तरप्रदेश राज्याच्या विधानसभेत स्वतंत्र राज्याचा ठराव संमत करण्यात आला.
- अखेरीस २००० मध्ये उत्तरांचल (सध्याचे उत्तराखंड) या स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
