Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.
१९४२ च्या ‘चलेजाव’ आंदोलनाची माहिती लिहा:
(अ) मुंबई अधिवेशन
(ब) महात्मा गांधीजींचे आवाहन
(क) आंदोलनाचे परिणाम
Very Long Answer
Advertisements
Solution
(अ) मुंबई अधिवेशन:
- राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे ‘ब्रिटिशांनी भारत सोडून जावे’ हा ठराव मंजूर केला. त्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब व्हायचे होते.
- ७ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाले.
- ८ ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी या अधिवेशनात मांडलेला ‘छोडो भारत’ ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. ब्रिटिशांनी तत्काळ भारत सोडावा अशी मागणी करण्यात आली.
(ब) महात्मा गांधीजींचे आवाहन:
- ८ ऑगस्ट १९४२ रोजी राष्ट्रीय सभेने मुंबई अधिवेशनात ‘ब्रिटिशांनी तत्काळ भारत सोडावा’ अशी मागणी केली. गांधीजींनी जनतेला आवाहन केले की, हे आंदोलन केवळ राष्ट्रीय सभेचे नसून सर्व भारतीयांचे आहे.
- प्रत्येक स्त्री-पुरूषाने या क्षणापासून आपण स्वतंत्र आहोत असे समजावे आणि लढ्यासाठी सिद्ध व्हावे. ‘करेंगे या मरेंगे’ (करो या मरो) ही आपली सर्वांची प्रतिज्ञा असली पाहिजे. या स्वातंत्र्य-प्रतिज्ञेसाठी सर्वांनी प्रसंगी बलिदानाची तयारी ठेवावी.
(क) आंदोलनाचे परिणाम:
- गांधीजीच्या या शब्दांनी देशात नवे चैतन्य निर्माण झाले.
- आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ते चिरडून टाकण्याचा सरकारन प्रयत्न केला.
- ९ ऑगस्टचा दिवस उजाडण्यापूर्वीच गांधीजी, मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल इत्यादी प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली.
- सरकारने सभा, मोर्चे, भाषणे आणि निदर्शने यांवर बंदी घातली. सरकारी आदेश धुडकावून लावत जनतेने अत्यंत धैर्याने ही चळवळ पुढे नेली.
- देशात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर क्रांतिकारी गट स्थापन झाले.
- आंदोलनासाठी गुप्त रेडिओ केंद्रे चालवली गेली आणि काही ठिकाणी प्रतिसरकारांची स्थापना झाली.
- त्यानंतर भारतात भाषावार राज्यांच्या निर्मितीनंतर झारखंड (२०००), उत्तराखंड (२०००) आणि तेलंगणा (२०१४) ही नवीन राज्ये निर्माण करण्यात आली.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
