Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.
सार्क (दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना) विषयी माहिती लिहा:
(अ) स्थापना व ध्येये
(ब) सार्क समोरील आव्हाने
(क) सार्कचे यश
सविस्तर उत्तर
Advertisements
उत्तर
(अ)
- सार्कची स्थापना:
- त्या वेळी बांगलादेशचे राष्ट्रपती झिया-उर-रहमान यांनी आशियाई राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी स्वतंत्र संघटना स्थापन करण्याची संकल्पना मांडली.
- १९८१ मध्ये बांगलादेश, भारत, भूटान, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव आणि नेपाळ या देशांच्या परराष्ट्र सचिवांची पहिली बैठक कोलंबो येथे झाली. ग्रामीण विकास, आरोग्य, व्यापार आणि लोकसंख्या यांसारख्या विषयांवर प्रादेशिक सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली.
- १९८३ मध्ये या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिल्ली येथे ‘सार्क घोषणा’ प्रसिद्ध केली. त्यानंतर १९८५ मध्ये ढाका येथे झालेल्या शिखर परिषदेत ‘दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना’ (SAARC) अधिकृतपणे स्थापन करण्यात आली.
- सार्कची ध्येये:
- सदस्य राष्ट्रांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणे आणि विकासाचा वेग वाढविणे.
- दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी अशा विघातक गोष्टींना विरोध करणे.
- परस्पर विश्वास वाढविण्यासाठी सामंजस्याचे वातावरण निर्माण करून समस्या निराकरण करणे.
- प्रादेशिक, विभागीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समविचारी संघटनांशी सहकार्य करणे.
- आंतरराष्ट्रीय पातळीवर सामायिक हितासाठी प्रयत्न करणे.
(ब) सार्क समोरील आव्हाने:
- सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक विषमता
- संरक्षणावरचा खर्च आणि वाढता दहशतवाद
- अपुऱ्या सोयी
- कृषी क्षेत्राचा अपुरा विकास
- भिन्न राज्यपद्धती
- लोकसंख्या विस्फोट आणि धार्मिक-भाषिक विविधता
(क) सार्कचे यश:
- कृषीविषयक माहिती प्रसारित करण्यासाठी बांगलादेशमध्ये केंद्र स्थापन करण्यात आले. तसेच बियाणे, पशुपालन आणि मत्स्यव्यवसाय यांवरील संशोधनासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.
- ढाका येथे सार्क हवामान संशोधन केंद्र स्थापले, काठमांडूमध्ये अिस्थरोग निवारण केंद्र सुरू झाले
- सार्क देशांमध्ये पर्यटनास चालना देण्यात आली.
- दक्षिण आशियातील गरिबी कमी करण्यासाठी सार्कने ‘आशिया प्रशांत क्षेत्रीय आर्थिक व सामाजिक मंडळ’ यांच्या मदतीने प्रयत्न केले.
- सदस्य राष्ट्रांमध्ये मुक्त व्यापार आणि आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी ‘दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र’ (SAFTA) करारासाठी आंतर-शासकीय गट स्थापन करण्यात आला.
- माहितीच्या प्रसारासाठी दिल्ली येथे ‘सार्क डॉक्युमेंटेशन सेंटर’ ची स्थापना करण्यात आली.
- इस्लामाबाद येथे सार्क मनुष्यबळ विकास केंद्र स्थापण्यात आले.
- अमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण आणण्यासाठी करार करण्यात आले. टपाल सेवा आणि वाहतूक क्षेत्रातील विकासासाठी समित्या नियुक्त करण्यात आल्या.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
