Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.
सार्क (दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना) विषयी माहिती लिहा:
(अ) स्थापना व ध्येये
(ब) सार्क समोरील आव्हाने
(क) सार्कचे यश
विस्तार में उत्तर
Advertisements
उत्तर
(अ) स्थापना व ध्येये:
- स्थापना:
- आशिया खंडात आर्थिक, सामाजिक विकासासाठी एखादी संघटना असावी असे बांगलादेशचे तत्कालीन प्रमुख झिया-उर-रहमान यांना वाटत होते.
- त्यांच्या कल्पनेतून बांगलादेश, भारत, भूटान, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, नेपाळ या देशांच्या परराष्ट्र सचिवांची १९८१ मध्ये एक बैठक झाली. ही बैठक कोलंबाे येथे झाली.
- या बैठकीत प्रादेशिक सहकार्यासाठी नियोजन, कृषी, ग्रामीण विकास, आरोग्य, लोकसंख्या आणि व्यापार या विषयांवर सहकार्य करण्याचे ठरले.
- १९८३ मध्ये दिल्ली येथे या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत सार्कचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
- १९८५ मध्ये ढाका येथे सार्कची स्थापना झाली.
- ध्येये:
- सदस्य राष्ट्रांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणे आणि विकासाचा वेग वाढविणे.
- दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी अशा विघातक गोष्टींना विरोध करणे.
- परस्पर विश्वास वाढविण्यासाठी सामंजस्याचे वातावरण निर्माण करून समस्या निराकरण करणे.
- प्रादेशिक, विभागीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समविचारी संघटनांशी सहकार्य करणे.
- आंतरराष्ट्रीय पातळीवर सामायिक हितासाठी प्रयत्न करणे.
(ब) सार्क समोरील आव्हाने: सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक विषमता, संरक्षणावरचा खर्च, दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी, कृषी क्षेत्राचा अपुरा विकास, वाढता दहशतवाद, लोकसंख्या विस्फोट, अपुरा व्यापार, भिन्न राज्यपद्धती, धार्मिक-भाषिक विविधता असे अनेक प्रश्न सार्कसमोर आहेत.
(क) सार्कचे यश:
- या संघटनेने आतापर्यंत काही क्षेत्रांत चांगली कामगिरी बजावली आहे. यात बांगलादेशमध्ये कृषी माहिती केंद्र सुरू करून बी-बियाणे, पशुधन आणि मत्स्योत्पादन यात संशोधन सुरू झाले.
- ढाका येथे सार्क हवामान संशोधन केंद्र स्थापले, काठमांडूमध्ये अस्थिरोग निवारण केंद्र सुरू झाले.
- सार्क देशांमध्ये पर्यटनास चालना देण्यात आली.
- दक्षिण आशियातील गरिबी कमी करण्यासाठी सार्कने ‘आशिया प्रशांत क्षेत्रीय आर्थिक व सामाजिक मंडळ’ यांच्या मदतीने प्रयत्न केले.
- व्यापार वृद्धीसाठी ‘उच्चस्तरीय आर्थिक सहकार्य मंडळ’ स्थापण्यात आले.
- सार्क दस्तऐवज केंद्रांच्या माध्यमातून माहिती पुरविण्याची सोय करण्यात आली.
- इस्लामाबाद येथे सार्क मनुष्यबळ विकास केंद्र स्थापण्यात आले.
- अमली पदार्थ व्यापार विरोधी करार करण्यात आले.
- डाकसेवा, दळणवळण अशासारख्या महत्त्वाच्या विषयांवर समित्या स्थापण्यात आल्या.
- दक्षिण आशियातील देशांमध्ये आपसातील व्यापार वृद्धिंगत व्हावा म्हणून १९९३ मध्ये ‘दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार’ (South Asian Preferential Trade Arrangement-SAPTA) आणि २००४ मध्ये ‘दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र’ (South Asian Free Trade Area-SAFTA) हे दोन करार करण्यात आले.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
