हिंदी

दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा.

पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.

दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा.

विस्तार में उत्तर
Advertisements

उत्तर

१९३९ ते १९४५ या दीर्घ काळात झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची कारणे पुढीलप्रमाणे -

  1. पहिल्या महायुद्धानंतरच्या व्हर्सायच्या तहात विजेत्या राष्ट्रांनी जर्मनीवर अपमानास्पद अटी लादल्यामुळे पराभूत राष्ट्रांमध्ये असंतोष निर्माण झाला.
  2. जर्मनीमध्ये हिटलरने सत्ता हस्तगत करून व्हर्सायचा तह फेटाळून लावला आणि नाझीवाद फोफावला.
  3. त्याने सैन्यबल, आरमार आणि वायुदल समर्थ करून जर्मनीचे लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर दिला.
  4. सोव्हिएट रशिया हे साम्यवादी राष्ट्र प्रबळ होत होते, जे भांडवलशाही राष्ट्रांना (इंग्लंड व फ्रान्स) धोकादायक वाटत असल्याने त्यांनी जर्मनीच्या आक्रमक धोरणाकडे दुर्लक्ष केले.
  5. जर्मनीने १९३८ मध्ये चेकोस्लाव्हाकियाचा सुडेटन प्रांत जिंकला आणि १९३९ मध्ये पोलंड या तटस्थ राष्ट्रावर आक्रमण केले.
  6. राष्ट्रसंघाला सदस्य राष्ट्रांचा आक्रमक राष्ट्रवाद व लष्करवाद यांना वेळीच आळा घालता आला नाही, त्यामुळे शांतता टिकवण्यात अपयश आले.
  7. पहिल्या महायुद्धानंतर युरोपात शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू होऊन प्रगत विध्वंसक शस्त्रांमुळे संपूर्ण युरोप दारूगोळ्याचे कोठार बनले.

शस्त्रास्त्र वाढ, आक्रमक राष्ट्रांच्या कृतींकडे दुर्लक्ष, गटबाजीचे धोरण या कारणांमुळे १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले.

shaalaa.com
दुसरे महायुद्ध (इ.स. १९३९ ते १९४५)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: जागतिक महायुद्धे आणि भारत - स्वाध्याय [पृष्ठ ६५]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 8 जागतिक महायुद्धे आणि भारत
स्वाध्याय | Q ५.१ | पृष्ठ ६५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×