Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला.
स्पष्ट कीजिए
कारण बताइए
Advertisements
उत्तर १
- दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचा विजय झाला; तरीही युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक आणि मनुष्यहानी प्रचंड प्रमाणात झाली.
- कमकुवत झालेल्या ब्रिटिश सत्तेचा भारतीय जनतेवरील व भारतीय सैनिकांवर असलेला दरारा कमी झाला.
- या काळात भारतात स्वातंत्र्यलढा तीव्र झाला होता. नाविकदलाचा उठाव, जनतेतील चळवळी दडपून टाकणे ब्रिटिश सरकारला कठीण जात होते.
- यापुढे आपण भारतातील सत्ता टिकवू शकणार नाही, याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली; त्यामुळे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला.
shaalaa.com
उत्तर २
- १९४५ सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरे महायुद्ध थांबले.
- त्यात इंग्लंडला विजय मिळाला खरा, परंतु युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक हानी व मनुष्य हानी फार मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे इंग्लंडची शक्ती कमी झाली.
- भारतातील ब्रिटिश सरकारला आता याची जाणीव झाली आहे की, भारतीय सैनिक आणि जनता पूर्वीसारखी नम्र व अधीन राहिलेली नाही; त्यांच्यावर राज्य करणे आता मुळीच सोपे राहिलेले नाही.
- तशातच भारतीय जनता आणि भारतीय सैनिक यांच्यावरील ब्रिटिश सत्तेचा दरारा नाहीसा झाल्याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाल्यामुळे भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला.
shaalaa.com
महायुद्धांचे भारतावरील परिणाम
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
