English

दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा.

Advertisements
Advertisements

Question

दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा.

Give Reasons
Advertisements

Solution

१९३९ ते १९४५ दरम्यान झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची कारणे पुढीलप्रमाणे होती:

  1. पहिल्या महायुद्धानंतर विजयी राष्ट्रांनी व्हर्साय तहानुसार जर्मनीवर कठोर अटी लादल्या. त्यामुळे जर्मनी आणि मित्रराष्ट्रांमध्ये असंतोष निर्माण झाला.
  2. जर्मनीमध्ये हिटलर सत्तेवर आला आणि त्याने व्हर्साय तह नाकारला.
  3. हिटलरने जर्मनीची लष्करी शक्ती वाढवून देश पुन्हा सक्षम केला. सैन्यबल, आरमार आणि वायुदल बळकट करण्यावर भर देण्यात आला.
  4. या काळात सोव्हिएट रशिया साम्राज्यवादी राष्ट्र म्हणून उदयास येत होता. सोव्हिएट रशिया साम्राज्यवादी जर्मनीचा मोठा शत्रू होता. सोव्हिएट रशिया बलिष्ठ होऊ नये म्हणून जर्मनीच्या आक्रमक धोरणाकडे इंग्लंड व फ्रान्स या राष्ट्रांनी दुर्लक्ष केले.
  5. सन १९३८ मध्ये हिटलरने चेकोस्लाव्हाकियाकडून बहुसंख्यांक जर्मन वस्ती असलेला सुडेटन प्रांत व इतर मुलुख मिळवला. हिटलरने १९३९ मध्ये पोलंडवर हल्ला केला.
  6. शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला आक्रमक राष्ट्रवाद आणि लष्करशाहीला वेळेत रोखता आले नाही. राष्ट्रसंघाने जर्मनी, इटली आणि जपान यांच्या आक्रमक धोरणांकडे दुर्लक्ष केले.
  7. पहिल्या महायुद्धानंतर युरोपमध्ये शस्त्रास्त्र स्पर्धेला सुरुवात झाली. प्रत्येक राष्ट्राने विनाशकारी आधुनिक शस्त्रास्त्रे विकसित केल्यामुळे युरोप दारुगोळ्याचे कोठार बनला. शस्त्रास्त्रांचा प्रसार, आक्रमक राष्ट्रांच्या कृतींकडे केलेले दुर्लक्ष आणि गटबाजी यांमुळे १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले.
shaalaa.com
दुसरे महायुद्ध (इ.स. १९३९ ते १९४५)
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: जागतिक महायुद्धे आणि भारत - स्वाध्याय [Page 65]

APPEARS IN

Balbharati Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 8 जागतिक महायुद्धे आणि भारत
स्वाध्याय | Q ५.१ | Page 65
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×