English

दोन व्यक्तींच्या उत्पन्नांचे गुणोत्तर 9 : 7 आहे व त्यांच्या खर्चांचे गुणोत्तर 4 : 3 आहे. प्रत्येकाची बचत 200 रुपये असेल तर प्रत्येकाचे उत्पन्न काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

दोन व्यक्तींच्या उत्पन्नांचे गुणोत्तर 9 : 7 आहे व त्यांच्या खर्चांचे गुणोत्तर 4 : 3 आहे. प्रत्येकाची बचत 200 रुपये असेल तर प्रत्येकाचे उत्पन्न काढा.

Sum
Advertisements

Solution

दोन व्यक्तींचे उत्पन्न x आणि y मानू.

`x/y = 9/7`

 ⇒ 7x = 9y

⇒ 7x − 9y = 0   ...(I)

दोन व्यक्तींची बचत = 200 रुपये.

खर्च = उत्पन्न − बचत

`(x − 200)/(y − 200) = 4/3`

∴ 3(x − 200) = 4(y − 200)

⇒ 3x − 600 = 4y − 800

⇒ 3x − 4y = −200   ...(II)

समीकरण (I) ला 3 ने आणि समीकरण (II) ला 7 ने गुणून.

21x − 27y = 0   ...(III)

21x − 28y = −1400   ...(IV)

(IV) − (III)

21x − 28y = −1400
21x − 27y = 0
−    +        −            
       − y = −1400

⇒ y = 1400

y = 1400 ही किंमत समीकरण (I) मध्ये ठेवू,

∴ 7x − 9y = 0

∴ 7x − 9(1400) = 0

∴ 7x − 12600 = 0

∴ 7x = 12600

∴ x = `12600/7`

∴ x = 1800

∴ अशा प्रकारे दोन व्यक्तींचे उत्पन्न 1800 आणि 1400 रुपये आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणांवरील शाब्दिक उदाहरणे
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: दोन चलांतील रेषीय समीकरण - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [Page 92]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 5 दोन चलांतील रेषीय समीकरण
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q (7) | Page 92

RELATED QUESTIONS

एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत.नोटांची एकूण किंमत 350 रु. आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे, तर पाकिटात 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या किती नोटा आहेत?


एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे. अंश व छेद यांत प्रत्येकी 1 मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 3 : 5 होते, तर तो अपूर्णांक काढा.


प्रियांका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्षे आहे. प्रियांका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांची वये काढा


एका प्राणिसंग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे, तर प्राणिसंग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा.


संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो. दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते. जर चार वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 रुपये झाला व 10 वर्षांनी मासिक पगार 5,400 रुपये झाला, तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढीची रक्कम काढा.


3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत 4500 रुपये आहे. 5 खुर्च्या व 3 टेबलांची किंमत 7000 रुपये आहे, तर 2 खुर्च्या व 2 टेबलांची एकूण किंमत काढा.


एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. जर अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे, तर ती दोन अंकी संख्या काढा.


एका 560 सेमी लांबीच्या दोरीचे दोन तुकडे असे करायचे आहेत, की लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट ही मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या `1/3` पट आहे, तर मोठ्या तुकड्याची लांबी काढा.


एका रस्त्यावरील A व B या दोन ठिकाणांमधील अंतर 70 किमी आहे. एक कार A ठिकाणाहून व दुसरी कार B या ठिकाणाहून निघते. जर त्या एकाच दिशेने निघाल्या तर एकमेकींना 7 तासात भेटतात व विरुद्ध दिशेने निघाल्यास 1 तासात भेटतात, तर त्यांचे वेग काढा.


एक दोन अंकी संख्या व त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 99 आहे, तर ती संख्या काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×