English

8 पुस्तके व 5 पेन यांची एकूण किंमत 420 रुपये आहे आणि 5 पुस्तके व 8 पेन यांची एकूण किंमत 321 रुपये आहे, तर एक पुस्तक व दोन पेन यांची किंमत काढा.

Advertisements
Advertisements

Question

8 पुस्तके व 5 पेन यांची एकूण किंमत 420 रुपये आहे आणि 5 पुस्तके व 8 पेन यांची एकूण किंमत 321 रुपये आहे, तर एक पुस्तक व दोन पेन यांची किंमत काढा.

Sum
Advertisements

Solution

एका पुस्तकाची किंमत ₹ x व एका पेनची  किंमत ₹ y मानू.

पहिल्या अटीनुसार 8 वह्या आणि 5 पेनची एकूण किंमत 420 रुपये आहे.

8x + 5y = 420 ...(I)

दुसऱ्या अटीनुसार 5 वह्या आणि 8 पेनची एकूण किंमत 321 रुपये आहे.

5x + 8y = 321 ...(II)

समीकरण (I) ला 5 ने गुणून,

40x + 25y = 2100 ...(III)

समीकरण (II) ला 8 ने गुणून,

40x + 64y = 2568 ...(IV)

समीकरण (IV) मधून समीकरण (III) वजा करून,

   40x + 64y = 2568
− 40x + 25y = 2100
             39y = 468 

∴ y = `468/39`

∴ y = 12

y = 12 ही किंमत समीकरण (I) मध्ये ठेवू,
8x + 5y = 420

 8x + 5(12) = 420 

∴ 8x + 60 = 420

∴ 8x = 420 − 60

∴ 8x = 360

∴ x = `360/8`

∴ x = 45

एक पुस्तक व दोन पेन यांची किंमत = x + 2y

= 45 + 2 (12)

= ₹ 69

∴ एक पुस्तक व दोन पेन यांची किंमत ₹ 69 आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणांवरील शाब्दिक उदाहरणे
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: दोन चलांतील रेषीय समीकरण - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [Page 92]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 5 दोन चलांतील रेषीय समीकरण
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q (6) | Page 92

RELATED QUESTIONS

एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत.नोटांची एकूण किंमत 350 रु. आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे, तर पाकिटात 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या किती नोटा आहेत?


एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे. अंश व छेद यांत प्रत्येकी 1 मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 3 : 5 होते, तर तो अपूर्णांक काढा.


प्रियांका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्षे आहे. प्रियांका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांची वये काढा


एका प्राणिसंग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे, तर प्राणिसंग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा.


एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. जर अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे, तर ती दोन अंकी संख्या काढा.


ΔABC मध्ये कोन A चे माप हे ∠B व ∠C या कोनांच्या मापांच्या बेरजेएवढे आहे. तसेच ∠B व ∠C यांच्या मापांचे गुणोत्तर 4:5 आहे. तर त्या त्रिकोणाच्या कोनांची मापे काढा.


एका 560 सेमी लांबीच्या दोरीचे दोन तुकडे असे करायचे आहेत, की लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट ही मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या `1/3` पट आहे, तर मोठ्या तुकड्याची लांबी काढा.


एक दोन अंकी संख्या, त्या संख्येतील अंकांच्या बेरजेच्या चौपटीपेक्षा 3 ने मोठी आहे. जर त्या संख्येमध्ये 18 मिळवले तर येणारी बेरीज ही मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मिळते, तर ती संख्या काढा.


एका रस्त्यावरील A व B या दोन ठिकाणांमधील अंतर 70 किमी आहे. एक कार A ठिकाणाहून व दुसरी कार B या ठिकाणाहून निघते. जर त्या एकाच दिशेने निघाल्या तर एकमेकींना 7 तासात भेटतात व विरुद्ध दिशेने निघाल्यास 1 तासात भेटतात, तर त्यांचे वेग काढा.


एक दोन अंकी संख्या व त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 99 आहे, तर ती संख्या काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×