English

3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत 4500 रुपये आहे. 5 खुर्च्या व 3 टेबलांची किंमत 7000 रुपये आहे, तर 2 खुर्च्या व 2 टेबलांची एकूण किंमत काढा.

Advertisements
Advertisements

Question

3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत 4500 रुपये आहे. 5 खुर्च्या व 3 टेबलांची किंमत 7000 रुपये आहे, तर 2 खुर्च्या व 2 टेबलांची एकूण किंमत काढा.

Sum
Advertisements

Solution

एका खुर्चीची किंमत ₹ x व एका टेबलाची किंमत ₹ y मानू.

3 खुर्च्या आणि 2 टेबल्सची किंमत 4500 रुपये आहे.

3x + 2y = 4500   ...(i)

5 खुर्च्या आणि 3 टेबलची किंमत 7000 रुपये आहे.

5x + 3y = 7000   ...(ii)

समीकरण (i) ला 3 ने गुणून व समीकरण (ii) ला 2 गुणून,

9x + 6y = 13500   ...(iii)

10x + 6y = 14000   ...(iv)

समीकरण (iii) मधून समीकरण (iv) वजा करून,

9x + 6y = 13500

10x + 6y = 14000
−     −      −           
−x           = −500

∴ x = 500

x = 500 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,

3 × 500 + 2y = 4500

∴ 1500 + 2y = 4500

∴ 2y = 4500 − 1500 = 3000

∴ y = 1500

∴ 2 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत

= 2x + 2y

= 2(x + y)

= 2 (500 + 1500)

= 2 × 2000

= 4000

∴ 2 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत ₹ 4000 आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणांवरील शाब्दिक उदाहरणे
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: दोन चलांतील रेषीय समीकरण - सरावसंच 5.2 [Page 90]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 5 दोन चलांतील रेषीय समीकरण
सरावसंच 5.2 | Q (6) | Page 90

RELATED QUESTIONS

एका प्राणिसंग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे, तर प्राणिसंग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा.


संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो. दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते. जर चार वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 रुपये झाला व 10 वर्षांनी मासिक पगार 5,400 रुपये झाला, तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढीची रक्कम काढा.


एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. जर अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे, तर ती दोन अंकी संख्या काढा.


ΔABC मध्ये कोन A चे माप हे ∠B व ∠C या कोनांच्या मापांच्या बेरजेएवढे आहे. तसेच ∠B व ∠C यांच्या मापांचे गुणोत्तर 4:5 आहे. तर त्या त्रिकोणाच्या कोनांची मापे काढा.


एका 560 सेमी लांबीच्या दोरीचे दोन तुकडे असे करायचे आहेत, की लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट ही मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या `1/3` पट आहे, तर मोठ्या तुकड्याची लांबी काढा.


एका स्पर्धा परीक्षेत 60 प्रश्न होते. प्रत्येक प्रश्नांच्या बरोबर उत्तराकरिता 2 गुण आणि चुकीच्या उत्तराकरिता ॠण एक गुण देण्यात येणार होता. यशवंतने सर्व 60 प्रश्न सोडवले तेव्हा त्याला 90 गुण मिळाले, तर त्याची किती प्रश्नांची उत्तरे चुकली होती?


8 पुस्तके व 5 पेन यांची एकूण किंमत 420 रुपये आहे आणि 5 पुस्तके व 8 पेन यांची एकूण किंमत 321 रुपये आहे, तर एक पुस्तक व दोन पेन यांची किंमत काढा.


दोन व्यक्तींच्या उत्पन्नांचे गुणोत्तर 9 : 7 आहे व त्यांच्या खर्चांचे गुणोत्तर 4 : 3 आहे. प्रत्येकाची बचत 200 रुपये असेल तर प्रत्येकाचे उत्पन्न काढा.


एका आयताची लांबी 5 एककाने कमी केली व रुंदी 3 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 9 चौरस एककाने कमी होते. जर लांबी 3 एककाने कमी केली व रुंदी 2 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 67 चौरस एककाने वाढते, तर आयताची लांबी व रुंदी काढा.


एक दोन अंकी संख्या व त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 99 आहे, तर ती संख्या काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×