Advertisements
Advertisements
Question
अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असे तुम्हांला वाटते? ते उपक्रम थोडक्यात सांगा.
Advertisements
Solution
मला पुढील सामाजिक उपक्रम करावे असे वाटते:
- झाडे लावणे: झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे, आपण जास्तीत जास्त झाडे लावायला हवीत. केवळ आपल्या राहत्या परिसरातच नव्हे, तर पावसाळ्याआधी ओसाड भागांत फिरून बिया पेरायला हव्यात. पाऊस आल्यावर त्या आपोआप रुजतात व झाडे उगवतात.
- अंध मुलांना गोष्टी सांगणे: अंध मुलांशी मैत्री करून त्यांना छान-छान गोष्टी सांगायला हव्यात. आपण जशी गोष्टींची पुस्तकं वाचतो, तशी पुस्तकं त्यांच्यासाठी उपलब्ध नसतात, म्हणूनच आपण त्यांना छान रंगवून गोष्टी सांगू शकतो.
- मोफत वाचनालय चालवणे: आपल्या सर्वांकडे गोष्टींची, चित्रकलेची, प्रसिद्ध व्यक्तींच्या चरित्रांची अशी अनेक प्रकारची पुस्तके असतात. ही पुस्तके जमा करून आसपासच्या गरीब मुलांसाठी मोफत वाचनालय चालवता येईल. रोज एखाद्या उद्यानात किंवा कट्ट्यावर मुलांना ही पुस्तके द्यायची. आठवड्यानंतर पुस्तक बदलून द्यायचे.
RELATED QUESTIONS
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुटलेला वारा कसा होता?
पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करता? उदा., छत्री खरेदी करणे.
‘मी झाड झाले तर...’ अशी कल्पना करून पाच ते सहा वाक्ये लिहा.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पसारा -
तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पाहा. यादी करा.
तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्याचे सहा-सात वाक्यांत वर्णन करा.
‘पटपट’ यासारखे शब्द लिहा.
‘पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा.’ याबाबत तुमचे मत दोन-तीन वाक्यांत लिहा.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
अवखळ वारा सुटल्यावर काय होते?
तुम्हांला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा.
