Advertisements
Advertisements
Question
एका आयताकृती बागेची अर्धपरिमिती 36 सेमी आहे. बागेची लांबी रुंदीपेक्षा 4 सेमी ने जास्त आहे, तर बागेचे एकूण क्षेत्रफळ किती?
Advertisements
Solution
समजा, आयताची लांबी x सेमी व रुंदी y सेमी आहे.
पहिल्या अटीनुसार,
एका आयताकृती बागेची अर्धपरिमिती 36 सेमी आहे.
∴ x + y = 36 …(i)
दुसऱ्या अटीनुसार,
बागेची लांबी रुंदीपेक्षा 4 सेमी ने जास्त आहे.
∴ x = y + 4
∴ x – y = 4 …(ii)
समीकरण (i) आणि (ii) यांची बेरीज करून,
x + y = 36
+ x - y = 4
2x = 40
∴ x = `40/2 = 20` ....(iii)
x = 20 ही किंमत (i) मध्ये ठेवून,
20 + y = 36
∴ y = 36 – 20 = 16 …(iv)
∴ बागेचे क्षेत्रफळ = A = x × y
= 20 × 16 …(iii) व (iv) वरून
= 320 सेमी
बागेचे एकूण क्षेत्रफळ = 320 सेमी आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले, तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, तर तो अपूर्णांक काढा.
कांताबाईंनी दुकानातून दीड किलो चहा व पाच किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये रिक्षाभाडे द्यावे लागले. यासाठी त्यांचे 700 रुपये खर्च झाले. नंतर त्यांना असे समजले, की या वस्तू ऑनलाइन ऑर्डर नोंदवून त्याच दराने घरपोच मिळतात. पुढील महिन्यात त्यांनी 2 किलोग्राम चहा व ७ किलोग्राम साखर ऑनलाइन मागवली, तेव्हा त्यांचा 880 रुपये खर्च झाला, तर चहा आणि साखर यांचा प्रतिकिलोग्राम दर काढा.

समीकरणे सोडवून उत्तर लिहा.
100 रुपयांच्या नोटांची संख्या `square` 50 रुपयांच्या नोटांची संख्या `square`
एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगारांचे गुणोत्तर 5 : 3 आहे. एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720 रुपये आहे, तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा.
एक कोन आणि त्याचा कोटिकोन यांच्या मापांतील फरक 10° असल्यास मोठ्या कोनाचे माप किती?

एक व्यक्ती एका निश्चित पगार आणि दरवर्षी ठरावीक वेतनवाढ या अटींवर नोकरी सुरू करते. 4 वर्षांनी त्या व्यक्तीचा पगार रुपये 15000 आणि 10 वर्षांनी पगार रुपये 18000 असल्यास त्या व्यक्तीचा मूळ पगार आणि वेतनवाढ काढा.
सोडवा. 0.4x + 0.3y = 1.7; 0.7x – 0.2y = 0.8.
कोणतीही दोन एकसामयिक समीकरणे लिहा- ज्यामध्ये चलांच्या किमती 12 आणि 10 असतील.
एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 24 सेमी आहे. एकरूप बाजूंची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा 13 सेमीने कमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी काढा.
