मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

एका अंकगणिती श्रेढीतील चार क्रमागत पदांची बेरीज 12 आहे. तसेच, त्या चार क्रमागत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज 14 आहे, तर ती चार पदे काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका अंकगणिती श्रेढीतील चार क्रमागत पदांची बेरीज 12 आहे. तसेच, त्या चार क्रमागत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज 14 आहे, तर ती चार पदे काढा.
(चार क्रमागत पदे a - d, a, a + d, a + 2d माना.)

बेरीज
Advertisements

उत्तर

समजा, चार क्रमागत पदे a - d, a, a + d आणि a + 2d आहेत.
दिलेल्या पहिल्या अटीनुसार, त्या चार क्रमागत पदांची बेरीज 12 आहे.

a - d + a + a + d + a + 2d = 12

∴ 4a + 2d = 12

∴ 2(2a + d) = 12

∴ 2a + d = `12/2`

∴ 2a + d = 6   ...(i)

दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार, तिसऱ्या व चौथ्या क्रमागत पदांची बेरीज 14 आहे.

a + d + a + 2d = 14

∴ 2a + 3d = 14    ....(ii)

समीकरण (ii) मधून समीकरण (i) वजा करून,

2a + 3d = 14
2a + d = 6
-    -       - 
2d = 8

∴ d = `8/2 = 4`

d = 4 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,

2a + 4 = 6

∴ 2a = 6 - 4 = 2

∴ a = `2/2 = 1`

∴ a - d = 1 - 4 = - 3

a = 1

a + d = 1 + 4 = 5

a + 2d = 1 + 2(4) = 1 + 8 = 9

∴ चार क्रमागत पदे -3, 1, 5 आणि 9 ही आहेत.

shaalaa.com
अंकगणिती श्रेढीतील पहिल्या n पदांची बेरीज
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: अंकगणित श्रेढी - सरावसंच 3.3 [पृष्ठ ७३]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 अंकगणित श्रेढी
सरावसंच 3.3 | Q 8. | पृष्ठ ७३

संबंधित प्रश्‍न

पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा.


1 व 350 यांमधील सर्व सम संख्यांची बेरीज काढा.


एका अंकगणिती श्रेढीचे 19 वे पद 52 आणि 38 वे पद 128 आहे, तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा.


एका अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे, तर तिचे 28 वे पद काढा.


एका अंकगणिती श्रेढीतील तीन क्रमागत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधा.
(तीन क्रमागत पदे a - d, a, a + d माना.)


एका अंकगणिती श्रेढीचे नववे पद शून्य आहे, तर 29 वे पद हे 19 व्या पदाच्या दुप्पट आहे दाखवा.


पहिल्या 1000 धन पूर्णांकांची बेरीज करा.

कृती: समजा, 1 + 2 + 3 + .........+ 1000

अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या n पदांच्या बेरजेचे सूत्र Sn = `square` वापरून,

S1000 = `square/2` (1 + 1000)

= 500 × 1001

= `square`

प्रथम 1000 धन पूर्णांकांची बेरीज `square` एवढी आहे.


4 ने भाग जाणाऱ्या तीन अंकी नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा.


1 ते 140 मधील 4 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज करा.


1 + 3 + 5 + ......... + 101 या 1 ते 101 पर्यंत विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×