मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

एका अंकगणिती श्रेढीचे 10 वे पद 46 आहे. 5 व्या व 7 व्या पदांची बेरीज आहे, तर ती श्रेढी काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका अंकगणिती श्रेढीचे 10 वे पद 46 आहे. 5 व्या व 7 व्या पदांची बेरीज 52 आहे, तर ती श्रेढी काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

या अंकगणिती श्रेढीचे, पहिले पद 'a' आणि सामाईक फरक 'd' मानू.

t10 = 46, t5 + t7 = 52    ....[दिलेले]

आता, , tn = a + (n – 1)d

∴ t10 = a + (10 – 1)d

∴ 46 = a + 9d

म्हणजेच, a + 9d = 46      ...(i)

तसेच, t5 + t7 = 52

∴ a + (5 - 1)d + a + (7 - 1)d = 52

∴ a + 4d + a + 6d = 52

∴ 2a + 10d = 52

∴ 2 (a + 5d) = 52

∴ a + 5d = `52/2`

∴ a + 5d = 26     ....(ii)

समीकरण (i) मधून समीकरण (ii) वजा करून,

a + 9d = 46
a + 5d = 26
-   -       -     
4d  = 20

∴ d = `20/4` = 5

d = 5 ही किंमत समीकरण (ii) मध्ये ठेवून,

a + 5d = 26

∴ a + 5(5) = 26

∴ a + 25 = 26

∴ a = 26 – 25 = 1

t1 = a = 1

t2 = t1 + d = 1 + 5 = 6

t3 = t2 + d = 6 + 5 = 11

t4 = t3 + d = 11 + 5 = 16

∴ 1, 6, 11, 16.... ही अंकगणिती श्रेढी आहे.

shaalaa.com
अंकगणिती श्रेढीचे n वे पद (nth term of an A. P.)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: अंकगणित श्रेढी - संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 [पृष्ठ ७९]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 अंकगणित श्रेढी
संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 | Q 3 | पृष्ठ ७९

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या अंकगणिती श्रेढीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा.

1, 8, 15, 22,...

येथे, a = `square`, t1 = `square`, t2 = `square`, t3 = `square`,...

t2 - t1 = `square - square = square`

t3 - t2 = `square - square = square`

∴ d =  `square`


खालील क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे का ते ठरवा; असेल, तर त्या श्रेढीचे विसावे पद काढा.

-12, -5, 2, 9, 16, 23, 30,...


तीन अंकी नैसर्गिक संख्यासमूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा.


एका अंकगणिती श्रेढीचे 11 वे पद 16 आणि 21 वे पद 29 आहे, तर त्या श्रेढीचे 41 वे पद काढा.


एका अंकगणिती श्रेढीचे 17 वे पद 10 व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे, तर सामान्य फरक काढा.


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

एका अंकगणिती श्रेढीचे तिसरे पद 13 आणि पाचवे पद 25 असले, तर तिचे 7 वे पद = ?


एका अंकगणिती श्रेढीमध्ये a = 2 व d = 3 आहेत, तर S12 काढा. 


जर a = 4 आणि d = 0, तर अंकगणिती श्रेढीची पहिली पाच पदे शोधा.


t8 = 3, t12 = 52 या अंकगणिती श्रेढीचे प्रथम पद व साधारण फरक काढा.


एका अंकगणिती श्रेढीमध्ये t10 = 57 व t15 = 87 असल्यास t21 काढा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×