Advertisements
Advertisements
प्रश्न
ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये , AB = 3 सेमी, ∠B = 90°, BC = 4 सेमी व त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:4 असल्यास ΔPBQ काढा.
Advertisements
उत्तर
विश्लेषण:

कच्ची आकृती
आकृतीत दाखवल्याप्रमाणे,
समजा, B – A – P व B – C – Q.
ΔPBQ ∼ ΔABC
∴ ∠PQB ≅ ∠ACB ..........[समरूप त्रिकोणांचे संगत कोन]
`"PB"/"AB" = "BQ"/"BC" = "PQ"/"AC"` ....(i) [समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]
∴ `"PB"/"AB" = "BQ"/"BC" = "PQ"/"AC" = 7/4` ........[पक्ष]
∴ ΔPBQ च्या बाजू या ΔABC च्या संगत बाजूंपेक्षा अधिक लांबीच्या आहेत.
∴ जर रेख BC चे 4 समान भाग केले, तर त्यांतील एका भागाच्या 7 पट रेख BQ असेल. म्हणून, जर ΔABC काढला, तर बिंदू Q हा बाजू BC वर B पासून 7 भाग अंतरावर असेल. आता, बिंदू Q मधून AC ला समांतर काढलेली रेषा व किरण BA यांचा छेदनबिंदू P हा आहे.
∴ ΔPBQ हा ΔABC शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे.

रचनेच्या पायऱ्या:
- 4 सेमी लांबीची रेख BC काढा.
- 90° मापाचा ∠B घेऊन त्यावर 3 सेमीचा कंस काढा. त्या बिंदूला A नाव द्या.
- रेख AC जोडून ΔABC मिळवा.
- किरण BX असा काढा, की ∠CBX हा लघुकोन असेल.
- किरण BX वर बिंदू B1, B2, B3, B4, B5, B6 आणि B7 असे घ्या, की BB1 = B1B2 = B2B3 = B3B4 = B4B5 = B5B6 = B6B7
- बिंदू C आणि B4 जोडा.
- B7 मधून CB4 ला समांतर असणारी व रेख BC ला बिंदू Q वर छेदणारी रेषा काढा.
- बिंदू Q मधून AC ला समांतर रेषा काढा. ही रेषा AB ला बिंदू P मध्ये छेदेल. ΔPBQ हा ΔABC शी समरूप असलेला इष्ट त्रिकोण आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी आणि `"AM"/"AH" = 7/5` तर ΔAHE काढा.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
ΔPQR ∼ ΔABC, `"PR"/"AC" = 5/7` तर ______
ΔABC हा 60° काढा व तो दुभागा.
∠PQR हा 115° काढा. त्याचे दोन एकरूप कोनांत विभाजन करा.
ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP व ΔNED काढा.
ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये, AB = 4 सेमी, BC = 5 सेमी, AC = 6 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 2:3 असल्यास ΔPBQ काढा.
ΔABC ~ ΔPBR, BC = 8 सेमी, AC = 10 सेमी , ∠B = 90°, `"BC"/"BR" = 5/4`, तर ΔPBR काढा.
ΔSHR ∼ ΔSVU, ΔSHR मध्ये SH = 4.5 सेमी, HR = 5.2 सेमी, SR = 5.8 सेमी, `"HS"/"SV" = 3/5`, तर ΔSVU काढा.
एक समद्विभुज त्रिकोण असा काढा, की त्याचा पाया 5 सेमी व उंची 4 सेमी आहे. त्या त्रिकोणाला समरूप त्रिकोण असा काढा, की त्याच्या बाजू मूळ त्रिकोणाच्या संगत बाजूंच्या `2/3` पट आहेत.
ΔPQR मध्ये, ∠P = 40°, PQ ≅ PR, QR = 7 सेमी. ΔXYZ ∼ ΔPQR, XY:PQ = 3:2 असल्यास ΔXYZ काढा.
