Advertisements
Advertisements
Question
विपणनाचे समाजासाठी असणारे महत्त्व स्पष्ट करा.
Explain
Advertisements
Solution
- राहणीमानात वाढ: विपणनाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्राहकांच्या गरजांची व समाधानाची पूर्तता करण्यासाठी त्यांना वस्तू व सेवांचा पुरवठा करणे हा असतो. पॉल मझूर यांच्या मते, “विपणन म्हणजे, समाजाला चांगल्या राहणीमानाचा पुरवठा करणे होय.” ग्राहकांच्या गरजा समजण्यास विपणनाची मदत होते आणि कमी दरामध्ये दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेता येतो.
- रोजगार पुरविणे: आधुनिक विपणन ही एक पद्धत आहे की ज्यात व्यवसायाच्या जवळजवळ सर्वच कार्यांचा समावेश होतो. उदा. खरेदी, विक्री, अर्थपुरवठा, वाहतूक, गोदाम, धोका पत्करणे, संशोधन आणि विकास इ. पद्धतींचा अवलंब करण्यासाठी मनुष्यबळाची गरज असते. अशाप्रकारे, विपणनामुळे लोकांना रोजगाराच्या संधी मिळतात.
- वितरण खर्चात घट: विपणन कार्यामुळे समाजाला वस्तू व सेवांचा पुरवठा स्वस्त दरामध्ये देणे शक्य आहे. कारण कार्यक्षम वितरण साखळी विपणनामध्ये असते. वितरण साखळीच्या कार्यक्षम वापरामुळे वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये घट होण्यास मदत होते. किमतीमध्ये घट झाल्यामुळे वस्तू व सेवांच्या संभाव्य ग्राहकांमध्ये वाढ होते. यामुळेच, वस्तू वेळेत उपलब्ध होण्याची खात्री असते.
- ग्राहक जागृकता: ग्राहकांना माहिती व शिक्षण देऊन विपणन समाजाला मदत करते. विपणन कार्यामुळे ग्राहकांच्या गरजांची पूर्तता होते. विपणनामुळे ग्राहकांना नवनवीन वस्तू व सेवांची माहिती मिळते आणि ग्राहकांना असणारी त्यांची उपयुक्तता समजते.
- राष्ट्रीय उत्पादनात वाढ: प्रत्येक अर्थव्यवस्था ही विपणन, उत्पादन आणि उद्योगाला अर्थपुरवठा याच्या भोवतीच फिरत असते. शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली विपणन कामे देशाच्या आर्थिक विकासास मदत करतात. वस्तू आणि सेवांच्या परिणामकारक विपणनामुळे औद्योगिकीकरणात वाढ होते. रोजगारात वाढ होणे आणि अर्थव्यवस्था स्थिर व बळकट बनते. विपणनामुळे कृषी क्षेत्र व उद्योगाचे एकीकरण होऊन देशाचा विकास वेगाने होतो.
- ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता: विपणन संशोधनामुळे व्यवसाय संस्थाना ग्राहकांच्या गरजांची जाणीव होते. त्यामुळे, वस्तूंचा विकास व ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता होण्यास मदत होते. विविध माध्यमाद्वारे ग्राहकांविषयी गोळा केलेल्या माहितीचे पुनरावलोकन केल्याने संस्थाना उत्पादनामध्ये आवश्यक ते बदल करता येतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
