English

फरक स्पष्ट करा. व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा BPO आणि कायदे प्रक्रिया बाह्यसेवा LPO. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा BPO आणि कायदे प्रक्रिया बाह्यसेवा LPO.

Distinguish Between
Advertisements

Solution

अ. क्र. मुद्दे व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा BPO आणि कायदे प्रक्रिया बाह्यसेवा LPO
१. अर्थ व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा म्हणजे प्राथमिकता नसलेल्या कार्यासाठी, तसेच खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी बाह्यसंस्थेकडे आऊटसोर्सिंग करणे होय. कायदे प्रक्रिया बाह्यसेवा हा आऊटसोर्सिंगचा एक प्रकार आहे. ज्याद्वारे कायदेविषयक सेवा प्रदान केली जाते. जसे, कायदेशीर कागदपत्रे तयार करणे, कायदेशीर संशोधन करणे, कायदेविषयक सल्ला देणे ही कार्ये काही मोबदल्याच्या बदल्यात केली जातात.
२. गुंतागुंतीची पायरी व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा ही कमी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. कायदे प्रक्रिया बाह्यसेवा ही तुलनात्मकदृष्ट्या जास्त गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.
३. आवश्यकता व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा यात प्रक्रिया कौशल्य आवश्यक असते. कायदे प्रक्रिया बाह्यसेवा यासाठी कायदेविषयक तज्ज्ञता/विशेषज्ञान आवश्यक असते.
४. कर्मचाऱ्यांमधील आवश्यक कौशल्य व्यवसाय प्रक्रिया बायसेवा यासाठी कर्मचाऱ्यांकडे उत्तम संभाषण कौशल्य असणे आवश्यक असते. कायदे प्रक्रिया बाह्यसेवा यासाठी कायदेविषयक व्यावसायिक गुणवत्ता व कायदयाचे सखोल ज्ञान असावे लागते.
५. लक्ष केंद्रित करणे व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा ही निम्न स्तरावरील प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करते. कायदे प्रक्रिया बाह्यसेवा ही उच्च स्तरावरील ज्ञानविषयक प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करते.
६. प्रत्यक्ष लाभ व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवेमुळे मालक संस्थेला कमी खर्चामध्ये कौशल्यपूर्ण व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होते. कायदे प्रक्रिया बायसेवा यामुळे सेवा घेणाऱ्या कंपनीला उच्चस्तरीय कायदेविषयक सेवा जी कंपनीमध्ये अपूर्ण आहे, ती विशेष सेवा उपलब्ध होते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×