English

टिपा लिहा. प्राच्यवादी इतिहासलेखन

Advertisements
Advertisements

Question

टिपा लिहा.

प्राच्यवादी इतिहासलेखन 

Short/Brief Note
Advertisements

Solution

युरोपमधील अभ्यासकांना पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांबद्दल कुतूहल होते. अशा प्रकारचा, आदर व कौतुक असलेल्या काही अभ्यासकांना प्राच्यवादी म्हटले जाते.

  1. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर त्यांनी भर दिला. यातूनच त्यांनी संस्कृत व युरोपीय भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो-युरोपीय भाषा अस्तित्वात होती अशी कल्पना मांडली.
  2. इसवी सन १७८४ मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे स्थापन केलेल्या 'एशियाटिक सोसायटीच्या'द्वारे भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासास चालना मिळाली.
  3. प्राच्यवादी अभ्यासकांमधील एक प्रमुख जर्मन इतिहासकार फ्रेडरिक मॅक्सम्युलर याने संस्कृत भाषा ही इंडो-युरोपीय भाषागटातील अतिप्राचीन शाखा होती असे प्रतिपादन केले. मॅक्सम्युलने 'हितोपदेश' या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसेच, 'द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट' या नावाने ५० खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन असणारे सहा खंड प्रसिद्ध केले आणि ऋग्वेदाचा इंग्रजी अनुवादही केला आहे.
  4. एडवर्ड सैद या विद्वानाने अलीकडच्या काळातील प्राच्यविद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्रज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणले.
    अशाप्रकारे, प्राच्यवादी अभ्यासकांनी प्राचीन वाङ्मय व इतिहासाच्या दृष्टीने इतिहासलेखन केलेले आहे.
shaalaa.com
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा - संक्षिप्त उत्तरे १

APPEARS IN

SCERT Maharashtra Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
संक्षिप्त उत्तरे १ | Q २. (ब) १.

RELATED QUESTIONS

मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?


इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
जेम्स ग्रँड डफ ______
______

द हिस्टरी ऑफ इंडिया

श्री.अ.डांगे ______
______ हू वेअर द शूद्राज

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

प्राच्यवादी इतिहासलेखन


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन


कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. 


रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते. 


महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनात ______ यांच्यापासून प्रेरणा मिळाली.  


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया
जेम्स ग्ँट डफ ______
______ द हिस्टरी ऑफ इंडिया
श्री. अ. डांगे ______
______ हू वेअर द शुद्राज 

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

   


स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा.


राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ______ यांचे नाव अग्रणी आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×