English

मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?

Advertisements
Advertisements

Question

मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?

Long Answer
Very Long Answer
Advertisements

Solution 1

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहासलेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात; त्यात ‘मार्क्सवादी इतिहासलेखन’ हा एक प्रमुख प्रवाह आहे.

  1. मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला ‘मार्क्सवादी इतिहासलेखन’ असे म्हणतात.
  2. मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.
  3. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो. याचे विश्लेषण करणे, हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे मुख्य सूत्र आहे.
  4. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातिव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहासलेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो.
shaalaa.com

Solution 2

  1. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय इतिहासलेखनावर ज्या प्रमुख विचारसरणींचा मोठा प्रभाव पडला, त्यामध्ये मार्क्सवादी इतिहासलेखनाचा समावेश होतो.
  2. प्रत्येक प्रमुख सामाजिक घटनेच्या परिणामांचे चिकित्सक परीक्षण करणे, हा मार्क्सवादी इतिहासलेखनाचा मूळ गाभा आहे. ही विचारसरणी वर्गसंघर्षावर अधिक भर देते आणि जातिव्यवस्था, उत्पादन पद्धती व कामगार संबंधांमधील बदलांचे विश्लेषण करते.
  3. मार्क्सवादी इतिहासलेखन उत्पादन साधनांचा समाजावर होणारा परिणाम विचारात घेते. सामाजिक घडामोडी आणि उत्पादन व्यवस्था यांच्यातील परस्परसंबंध हेच मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनाचे केंद्रबिंदू असतात.
  4. सर्व सामाजिक घटनांचे चिकित्सक परीक्षण केले गेले पाहिजे, कारण त्या घटनांचा लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष परिणाम होत असतो; अशी भूमिका या इतिहासकारांनी मांडली.
  5. भारतातील कॉम्रेड शरद पाटील, राम शरण शर्मा, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आणि दामोदर धर्मानंद कोसंबी यांसारखे अनेक नामवंत इतिहासकार मार्क्सवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते.
  6. उदाहरणार्थ, कॉम्रेड डांगे यांनी लिहिलेला ‘आदिम साम्यवाद ते गुलामगिरी’ हा ग्रंथ मार्क्सवादी इतिहासलेखनाचे एक उत्तम उदाहरण आहे.
  7. थोडक्यात सांगायचे तर, मार्क्सवादी इतिहासलेखनातील वर्गसंघर्ष, आर्थिक पैलू आणि सामाजिक परिवर्तन यांवर दिलेल्या विशेष भरानें भारतीय इतिहासलेखनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे.
shaalaa.com
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा - लांब उत्तरे २

APPEARS IN

SCERT Maharashtra Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
लांब उत्तरे २ | Q ५. १.
Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
स्वाध्याय | Q ३. (१) | Page 14

RELATED QUESTIONS

हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
जेम्स ग्रँड डफ ______
______

द हिस्टरी ऑफ इंडिया

श्री.अ.डांगे ______
______ हू वेअर द शूद्राज

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

प्राच्यवादी इतिहासलेखन


कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. 


रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते. 


महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनात ______ यांच्यापासून प्रेरणा मिळाली.  


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया
जेम्स ग्ँट डफ ______
______ द हिस्टरी ऑफ इंडिया
श्री. अ. डांगे ______
______ हू वेअर द शुद्राज 

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

   


पुढील तक्ता पूर्ण करा.   

स्त्रीवादी लेखिका स्त्रीवादी लेखन
ताराबाई शिंदे ______
______ द हाय कास्ट हिंदू वुमन
मीरा कोसंबी ______
______ रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज

टिपा लिहा.

प्राच्यवादी इतिहासलेखन 


टिपा लिहा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन


स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा.


बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×