Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.
Advertisements
Solution
नाटक ही समूहकला आहे. त्यातील नाटककार हा पहिला व महत्त्वाचा घटक आहे. नाटककाराला नाटक लिहिण्यासाठी सशक्त कथाबीज सुचते व त्यातून नाट्यसंहिता निर्माण होते. नाट्यसंहिता लिहिण्यासाठी नाटककाराला नाटकाच्या सर्व अंगांचे ज्ञान आवश्यक असते.
नाट्यसंहितेसाठी पूर्वतयारी महत्त्वाची आहे. सशक्त, दर्जेदार व परिपूर्ण कथाबीजाभोवती नाटककार निवडक घटना व व्यक्तिरेखा यांची गुंफण करतो. नाट्यतंत्रानुसार नाटकाची वैशिष्ट्यपूर्ण रचना करावी लागते. समाजातील विविध स्तरांवरील जनमानसाला जिव्हाळ्याचे वाटणारे विषय घेऊन मनोव्यापारांचे यथार्थ रसपूर्ण दर्शन घडवणे, हे नाट्यसंहितेचे मर्म आहे. कथानकाला साजेशी निवडक पात्र रचना करणे व परस्परविरोधी स्वभावांतील ताणांमधून संघर्ष निर्माण करणे, हा नाट्यसंहितेचा आदिबंध आहे. संवाद हा नाट्यसंहितेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चुरचुरीत, नर्मविनोदी, कधी खटकेबाज, तर कधी भावोत्कट संवादांची पखरण नाट्यसंहितेत असावी लागते. अशा प्रकारे संवाद, संघर्ष, मनोव्यापारातील चढउतार, स्वगतातील भावपूर्णता व रंगसूचना यांच्या समतोल मेळातून नाट्यसंहिता सशक्त व समर्थ होते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे’, हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
‘इथे माणूस ‘दिसत’ होता, पण ‘जाणवत’ नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती’, या विधानांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.
संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे 'भार्कीन तुमच्या शब्दांत व्यक्त करा,
वैशिष्ट्ये लिहा.
दूरदर्शनवरील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
'कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल'
सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
टॉलस्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनेची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा.
| ज्ञानेंद्रिये | संवेदनांची उदाहरणे |
| (१) डोळे | |
| (२) कान | |
| (३) नाक | |
| (४) त्वचा |
सूचनेप्रमाणे सोडवा
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.
- मन:पटलावरील प्रतिमा
- 'युद्ध आणि शांती' ही कादंबरी
'कादंबरी' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
तपशिलांचा महासागर :
चुकीचे विधान शोधा.
चुकीचे विधान शोधा.
चुकीचे विधान शोधा.
चुकीचे विधान शोधा.
खालील कृती करा.

खालील कृती करा.

खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन |
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| नाटकात संघर्ष असला तर |
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील संवाद
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा
अभिव्यक्ती.
विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.
