English

साक्षरतेचे प्रमाण. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

साक्षरतेचे प्रमाण.

Short/Brief Note
Advertisements

Solution

लोकसंख्या घटकांमध्ये साक्षरतेचे प्रमाण हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. साक्षरतेचे प्रमाण हा लोकसंख्येचा किंवा त्या प्रदेशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचाही मापदंड मानला जातो. प्रत्येक प्रदेशाची किंवा देशाची साक्षरतेची व्याख्या वेगळी आहे. भारतामध्ये साक्षरतेचे प्रमाण ठरवण्यासाठी ७ वर्षांवरील व्यक्ती हा मूळ आधार मानला जातो. ७ वर्षांवरील व्यक्तीस किमान एक तरी भाषा लिहिता-वाचता येणे व किमान दैनंदिन जीवनात आवश्यक अंकगणिती क्रिया समजून करता येणे या घटकांच्या आधारे व्यक्ती साक्षर आहे किंवा नाही हे ठरवले जाते. काही देशात साक्षरता ठरवण्यासाठी किमान वयाची अट १५ वर्षे धरली जाते, तर काही विकसित देशात साक्षरतेमध्येही विविध श्रेणी केलेल्या आढळतात.
साक्षरता आणि देशाच्या विकासात लोकांचे राहणीमान व स्त्रियांचा समाजातील दर्जा याचा थेट संबंध दिसतो. खरतर साक्षरता आणि देशाचा विकास हे परस्परपूरक असून ते एकमेकांशी कार्यकारणसंबंध दर्शवतात. साक्षरता जेवढी जास्त तेवढी देशाच्या विकासाची शक्यता जास्त आणि देशाचा विकास जेवढा जास्त तेवढे साक्षरतेचे प्रमाण जास्त. म्हणजेच साक्षरता हे आर्थिक विकासाचे कारण आणि परिणाम असे दोन्ही निकष पूर्ण करते.
साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्यास कार्यशील लोकसंख्येचा दर्जाही उंचावतो. अशी लोकसंख्या अर्थातच द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक श्रेणीच्या व्यवसायात जास्त प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे साधनसंपत्तीची निर्मिती होते. देशाची आर्थिक वृद्धी होते. लोकांचे राहणीमान सुधारते. वाहतूक, उदयोग, शिक्षण, वैद्यकीय सेवा-सुविधा यांत वाढ होते. या सर्वांमुळे देशाची आर्थिक विकासाची पातळी उंचावते आणि या जास्त आर्थिक विकासामुळे पुन्हा शासनाचे शिक्षणासंबंधीचे धोरण बदलते. अधिकाधिक शैक्षणिक सेवा-सुविधा पुरवल्या जातात. शिक्षणावरही जास्त जोर दिला जातो आणि लोकसंख्या अधिक कार्यकुशल व कार्यशील कशी होईल यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. म्हणूनच एखाद्या देशाची साक्षरता आणि आर्थिक विकास हे परस्परपूरक आहेत असे म्हटले जाते.

shaalaa.com
लोकसंख्येचे घटक
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: लोकसंख्या - भताग २ - स्वाध्याय [Page 20]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 2 लोकसंख्या - भताग २
स्वाध्याय | Q २. ४) | Page 20

RELATED QUESTIONS

A: लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते.
R: लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे.


लोकसंख्या वाढ व स्थलांतर


लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर.


लोकसंख्येची व्यावसायिक संरचना.


विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे.


खालील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा.

लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.


फरक स्पष्ट करा.

विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा.


लोकसंख्या मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्त्व स्पष्ट करा.


लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना स्पष्ट करा.


दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

  1. कोणत्या देशाचा स्त्री प्रौढ साक्षरता दर खूप कमी आहे?
  2. दिलेल्या तीन प्रदेशात प्रौढ साक्षरता दरात पुरुषांची टक्केवारी अधिक असण्याचे कारण काय असावे?
  3. २०१६ मधील सहारा बाळवंटी प्रदेशातील स्त्री-पुरुष साक्षरता दरातील टक्केवारी कमी असण्याचे कारण म्हणजे स्त्री शिक्षणाला अनुत्तम प्राधान्य आणि सामाजिक-आर्थिक अडचणी.
  4. आलेखातील स्त्री प्रौढ साक्षरता दराविषयी स्वमत लिहा.
  5. आलेखातील कोणता देश सामाजिक दृष्ट्या प्रगत असेल?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×