English

लोकसंख्येची व्यावसायिक संरचना. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

लोकसंख्येची व्यावसायिक संरचना.

Short/Brief Note
Advertisements

Solution

लोकसंख्येची व्यावसायिक संरचना अभ्यासताना त्यात केवळ १५ ते ५९ वयोगटातील कार्यशील लोकसंख्येचे प्रमाणच गृहीत धरले जाते. १५ ते ५९ वयोगटातील कार्यशील लोकसंख्येचे व्यवसायानुसार वर्गीकरण म्हणजे लोकसंख्येची व्यावसायिक संरचना होय. कार्यशील लोकसंख्येपैकी काही लोक प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक अशा विविध व्यवसायात कार्यरत असतात. अर्थात, या विविध व्यवसायांतील कार्यशील लोकसंख्येचे प्रत्यक्ष प्रमाण किंवा टक्केवारी आणि देशाची आर्थिक व सामाजिक स्थिती यांचा परस्परसंबंध आहे. एखाद्या प्रदेशात प्राथमिक व्यवसायात जर कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल, तर असा देश विकसनशील देश दिसून येतो. यालाच कृषिप्रधान अर्थव्यवस्था म्हणतात. याला कारण प्राथमिक व्यवसायात लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यास द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायांत लोकसंख्येचे प्रमाण कमी असते. याचा अर्थ पायाभूत सेवा-सुविधा, उदयोग आणि कुशल मनुष्यबळ लागणारे विविध व्यवसाय अशा प्रदेशात कमी विकसित झालेले दिसतात.
मात्र, जशी लोकसंख्येची कार्यकुशलता वाढते, तसे प्राथमिक व्यवसायातील लोकसंख्येचे प्रमाण कमी होत जाते आणि द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायांतील लोकसंख्येचे प्रमाण वाढते. शैक्षणिक सेवा-सुविधा वाढतात, तंत्रज्ञानाच्या आधारे विविध उदयोग- व्यवसाय वाढतात व साधनसंपत्तीची निर्मिती होते. पायाभूत सेवा सुविधा निर्माण केल्या जातात आणि या तांत्रिक प्रगतीच्या आधारे प्राथमिक व्यवसायात कमी लोकसंख्या कार्यरत असूनही प्राथमिक व्यवसाय उत्तम प्रकारे कार्यरत राहतात. याला उद्योगप्रधान अर्थव्यवस्था असेही म्हणतात. अर्थात हे उद्योग आर्थिकदृष्ट्या विकसित असतात.

shaalaa.com
लोकसंख्येचे घटक
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: लोकसंख्या - भताग २ - स्वाध्याय [Page 20]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 2 लोकसंख्या - भताग २
स्वाध्याय | Q २. ३) | Page 20

RELATED QUESTIONS

A: लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते.
R: लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे.


लोकसंख्या वाढ व स्थलांतर


साक्षरतेचे प्रमाण.


विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे.


खालील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा.

लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.


जेव्हा कार्यशील लोकसंख्येत वाढ होते, तेव्हा लोकसंख्या लाभांशातही वाढ होते. 


फरक स्पष्ट करा.

विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा.


लोकसंख्या मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्त्व स्पष्ट करा.


आकृती काढून नावे द्या.

अविकसित देशाचा लोकसंख्येचा मनोरा.


दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

  1. कोणत्या देशाचा स्त्री प्रौढ साक्षरता दर खूप कमी आहे?
  2. दिलेल्या तीन प्रदेशात प्रौढ साक्षरता दरात पुरुषांची टक्केवारी अधिक असण्याचे कारण काय असावे?
  3. २०१६ मधील सहारा बाळवंटी प्रदेशातील स्त्री-पुरुष साक्षरता दरातील टक्केवारी कमी असण्याचे कारण म्हणजे स्त्री शिक्षणाला अनुत्तम प्राधान्य आणि सामाजिक-आर्थिक अडचणी.
  4. आलेखातील स्त्री प्रौढ साक्षरता दराविषयी स्वमत लिहा.
  5. आलेखातील कोणता देश सामाजिक दृष्ट्या प्रगत असेल?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×