English

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या.

Explain
Give Reasons
Advertisements

Solution 1

अमेरिका खंडाचा शोध लागल्यानंतर तेथे वसाहती स्थापन करण्यासाठी युरोपीय राष्ट्रांत विविध कारणांसाठी चढाओढ सुरू झाली.

  1. पोर्तुगाल आणि स्पेन यांना तेथे सोन्याचे साठे सापडले. खाणींमधून अफाट खनिज संपत्ती मिळू लागली.
  2. स्थानिक रेड इंडियन्स आणि आफ्रिकेतून आणलेले गुलाम यांच्याकडून ते ऊस, तंबाखू यांचे उत्पादन तयार करून घेऊ लागले.
  3. स्पेन, पोर्तुगाल यांची झालेली भरभराट पाहून इंग्लंड, हॉलंड व फ्रान्स यांनी अमेरिका खंडात आपल्या वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली.
  4. अमेरिकेतून कच्चा माल आपल्या देशात नेऊन तेथून पक्का माल तयार करून अमेरिकन वसाहतींत विकला जाऊ लागला. हक्काची बाजारपेठ म्हणून युरोपियनांनी येथे आपल्या वसाहती स्थापन केल्या.
shaalaa.com

Solution 2

अमेरिकेतील वसाहतवादाचा अभ्‍यास करताना आपल्‍या असे लक्षात येते की या काळात बलाढ्य युरोपीय राष्‍ट्रांनी अन्य दुर्बल राष्‍ट्रांवर आपले प्रभुत्‍व स्‍थापून वसाहतींना राजकीय गुलामगिरीत ढकलले. वसाहतवादी युरोपीय स्थलांतरितांनी अमेरिका खंडातील मूळ रहिवाशांच्या जमिनी बळकावून प्रसंगी त्यांची कत्तल केली. मेक्‍सिको आणि पेरू देशातील स्थानिकांची राज्‍ये नष्‍ट केली. त्‍यांच्यावर गुलामगिरी लादली. युरोपियांनी सोन्याच्या खाणींचा शोध लावला आणि स्पॅनिश वसाहतवाद्यांनी ऊस व तंबाखूच्या शेतांमध्ये काम करण्यासाठी आफ्रिकन गुलामांना आणले. शेती आणि खाणकामामुळे त्यांना प्रचंड संपत्ती प्राप्त झाली. आवश्यक कच्चा माल स्पेनला निर्यात केला जात असे, तर वसाहतींमधील स्थानिक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी तयार वस्तू आयात केल्या जात असत. सोने आणि चांदीच्या व्यापारातून राजालाही मोठा नफा मिळत असे. स्‍पेनची भरभराट पाहून इंग्‍लंड, हॉलंड आणि फ्रान्स यांनीही अमेरिका खंडात आपल्या वसाहती स्थापण्यास सुरुवात केली.

shaalaa.com
युरोपीय वसाहतवाद - अमेरिकेतील वसाहतवाद
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: युरोपीय वसाहतवाद - स्वाध्याय [Page 18]

APPEARS IN

Balbharati Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 2 युरोपीय वसाहतवाद
स्वाध्याय | Q ५.२ | Page 18
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×