Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या.
Advertisements
उत्तर १
अमेरिका खंडाचा शोध लागल्यानंतर तेथे वसाहती स्थापन करण्यासाठी युरोपीय राष्ट्रांत विविध कारणांसाठी चढाओढ सुरू झाली.
- पोर्तुगाल आणि स्पेन यांना तेथे सोन्याचे साठे सापडले. खाणींमधून अफाट खनिज संपत्ती मिळू लागली.
- स्थानिक रेड इंडियन्स आणि आफ्रिकेतून आणलेले गुलाम यांच्याकडून ते ऊस, तंबाखू यांचे उत्पादन तयार करून घेऊ लागले.
- स्पेन, पोर्तुगाल यांची झालेली भरभराट पाहून इंग्लंड, हॉलंड व फ्रान्स यांनी अमेरिका खंडात आपल्या वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली.
- अमेरिकेतून कच्चा माल आपल्या देशात नेऊन तेथून पक्का माल तयार करून अमेरिकन वसाहतींत विकला जाऊ लागला. हक्काची बाजारपेठ म्हणून युरोपियनांनी येथे आपल्या वसाहती स्थापन केल्या.
उत्तर २
अमेरिकेतील वसाहतवादाचा अभ्यास करताना आपल्या असे लक्षात येते की या काळात बलाढ्य युरोपीय राष्ट्रांनी अन्य दुर्बल राष्ट्रांवर आपले प्रभुत्व स्थापून वसाहतींना राजकीय गुलामगिरीत ढकलले. वसाहतवादी युरोपीय स्थलांतरितांनी अमेरिका खंडातील मूळ रहिवाशांच्या जमिनी बळकावून प्रसंगी त्यांची कत्तल केली. मेक्सिको आणि पेरू देशातील स्थानिकांची राज्ये नष्ट केली. त्यांच्यावर गुलामगिरी लादली. युरोपियांनी सोन्याच्या खाणींचा शोध लावला आणि स्पॅनिश वसाहतवाद्यांनी ऊस व तंबाखूच्या शेतांमध्ये काम करण्यासाठी आफ्रिकन गुलामांना आणले. शेती आणि खाणकामामुळे त्यांना प्रचंड संपत्ती प्राप्त झाली. आवश्यक कच्चा माल स्पेनला निर्यात केला जात असे, तर वसाहतींमधील स्थानिक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी तयार वस्तू आयात केल्या जात असत. सोने आणि चांदीच्या व्यापारातून राजालाही मोठा नफा मिळत असे. स्पेनची भरभराट पाहून इंग्लंड, हॉलंड आणि फ्रान्स यांनीही अमेरिका खंडात आपल्या वसाहती स्थापण्यास सुरुवात केली.
संबंधित प्रश्न
'स्वातंत्र्याचा जाहिरनामा' ______ याने तयार केला.
दुसरे ब्रह्मी युद्ध ______ च्या काळात लढले गेले.
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता - ______
टीप लिहा.
अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध
खालील विधानावर तुमचे मत नोंदवा.
अमेरिकेतील वसाहतींमुळे स्पेनची भरभराट झाली.
