Advertisements
Advertisements
Question
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृतिबंध पूर्ण करा. (२)

२) उत्तरे लिहा. (२)
- मुलगी खेळत असलेले ठिकाण - ______
- कवयित्री जेथून पाहते ती जागा - ______
|
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून ती मांडीवर घेते बाहुलीला बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून हळूहळू शिकेल तोही माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे |
३) पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीन
४) पुढील काव्यपंक्तींतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दांत लिहा. (२)
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून
Advertisements
Solution
१)
| मुलगी भातुकलीच्या खेळामध्ये करत असणारी कामे | |
| बाहुलीला मांडीवर झोपवत आहे. | भात शिजवण्यासाठी टोपात भाताचे आधण ठेवत आहे. |
२)
- मुलगी खेळत असलेले ठिकाण - आडोसा
- कवयित्री जेथून पाहते ती जागा - घराचा झरोका
३) भातुकलीच्या लुटुपुटु स्वप्नाळू जगातून वास्तवात प्रवेश करताना या दोन्ही मुलांचा हात एकमेकांच्या हातात असेल. ज्या हातांवर बाहुली आणि चेंडू दोन्ही स्नेहाने, सहज एकत्र विसावलेले असतील.
४) ‘आश्वासक चित्र’ या कवितेतून कवयित्री नीरजा यांनी भविष्यातील स्त्री-पुरुष समानतेविषयीचे आश्वासक चित्र रेखाटले आहे. कवयित्री येथे सकारात्मक चित्र साकार करत म्हणते, की आपले कौशल्य दाखवता दाखवता तापलेल्या उन्हात आडोशाला सावलीमध्ये बसून तो मुलगा हळूहळू घर सांभाळायलाही शिकेल. भूतकाळातील असमानतेची दरी भविष्यकाळात नष्ट होईल आणि स्त्री-पुरुष समानता निर्माण होईल हा विचार या काव्यपंक्तींतून व्यक्त झाला आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेतील मूल्य | आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी |
मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा.
(अ) ______
(आ) ______
कवितेतील (आश्वासक चित्र) खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.
मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर
कवितेतील (आश्वासक चित्र) खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.
मी दोन्ही करू शकते एकाच वेळी
खालील ओळींचे तुमच्या शब्दांत रसग्रहण करा.
‘भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात, हातांत हात असेल दोघांचाही’
‘ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?’ या ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
कवितेतील (आश्वासक चित्र) मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हांला वाटते, तुमच्या शब्दांत लिहा.
‘स्त्री-पुरुष समानते’ बाबत तुम्हांला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
आश्वासक चित्र
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्यांच्या
मुलगा दाखवतो, तिला आपलं कसब पुन्हा एकदा
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) कोण ते लिहा. (२)
- भातुकलीचा खेळ खेळणारी- ______
- चेंडूचा खेळ खेळणारा- ______
२) आकृतिबंध पूर्ण करा. (२)
- मुलगी मुलाचा हा खेळ खेळून दाखवते.- ______
- मुलगा गॅससमोर बसून ही कृती करतो.- ______
|
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून ती मांडीवर घेते बाहुलीला बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून हळूहळू शिकेल तोही माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे |
३) पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
तेव्हा तो हसून म्हणतो,
'तू भाजी बनवू छानपैकी पाल्याची.' ती म्हणते,
'मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?'
मुलगा देतो चेंडू तिच्या हातात.
४) पुढील काव्यपंक्तींतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दांत लिहा. (२)
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.
खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.
खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
| क्र. | मुद्दे | आश्वासक चित्र |
| 1. | प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
| 2. | कवितेचा विषय - | |
| 3. | शब्दांचे अर्थ लिहा. | i. झरोक - ______ |
| ii. कसब - ______ |
