Advertisements
Advertisements
Question
खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्यांच्या
मुलगा दाखवतो, तिला आपलं कसब पुन्हा एकदा
Advertisements
Solution
'आश्वासक चित्र' या कवितेत कवयित्री नीरजा यांनी स्त्री-पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र रेखाटले आहे. भविष्यात हे चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा आशावादी विचार यात मांडला आहे. भातुकली व चेंडू हे खेळ स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक भूमिकांतून बाहेर पडून स्त्री-पुरुषांनी समानतेचे जीवन स्वीकारले. परस्पर सामंजस्य व सहकार्याने त्यांनी जीवन जगावे असा सकारात्मक संदेश कवयित्री या कवितेतून देऊ पाहते.
प्रस्तुत काव्यपंक्तींत मुलाचा चेंडू उडवण्याचा खेळ कौतुकाने पाहणारी मुलगी अचानक बाहुली बाजूला ठेवून त्याच्याजवळ जाते. मुलगा आपले कौशल्य तिला दाखवण्यासाठी परत चेंडू उडवतो. यातून मुलाची पुरुषप्रधान विचारसरणी लक्षात येते, मी जे करतो आहे ते तुला जमणार नाही असेच काहीसे त्याला दाखवून द्यायचे आहे. मुलगी त्याचे आव्हान स्वीकारण्याच्या हेतूनेच त्याच्याजवळ आली आहे. स्त्रिया एकाच वेळी अनेक कामे करण्यास सक्षम असतात हे तिला दाखवून द्यायचे आहे.
बाहुलीसारख्या समर्पक प्रतिमांच्या वापरातून ही कविता आपल्याला चिंतन करण्यास प्रवृत्त करते. या कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे. साध्या सोप्या व संवादात्मक भाषेतून कवयित्रीने स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेतील आशय मुक्तपणे मांडण्यासाठी कवयित्रीने येथे 'मुक्तछंद' वापरला आहे. त्यामुळे, कवितेतील वास्तव वाचकांच्या मनाला भिडते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेतील मूल्य | आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी |
चौकट पूर्ण करा.
कवयित्रीच्या मनातील आशावाद - ______
कवितेतील (आश्वासक चित्र) खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.
मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर
कवितेतील (आश्वासक चित्र) खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.
मी दोन्ही करू शकते एकाच वेळी
कवितेतील (आश्वासक चित्र) खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.
जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी
खालील ओळींचे तुमच्या शब्दांत रसग्रहण करा.
‘भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात, हातांत हात असेल दोघांचाही’
‘ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?’ या ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
कवितेतील (आश्वासक चित्र) मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हांला वाटते, तुमच्या शब्दांत लिहा.
‘स्त्री-पुरुष समानते’ बाबत तुम्हांला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृतिबंध पूर्ण करा. (२)

२) उत्तरे लिहा. (२)
- मुलगी खेळत असलेले ठिकाण - ______
- कवयित्री जेथून पाहते ती जागा - ______
|
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून ती मांडीवर घेते बाहुलीला बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून हळूहळू शिकेल तोही माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे |
३) पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीन
४) पुढील काव्यपंक्तींतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दांत लिहा. (२)
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
आश्वासक चित्र
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) कोण ते लिहा. (२)
- भातुकलीचा खेळ खेळणारी- ______
- चेंडूचा खेळ खेळणारा- ______
२) आकृतिबंध पूर्ण करा. (२)
- मुलगी मुलाचा हा खेळ खेळून दाखवते.- ______
- मुलगा गॅससमोर बसून ही कृती करतो.- ______
|
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून ती मांडीवर घेते बाहुलीला बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून हळूहळू शिकेल तोही माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे |
३) पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
तेव्हा तो हसून म्हणतो,
'तू भाजी बनवू छानपैकी पाल्याची.' ती म्हणते,
'मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?'
मुलगा देतो चेंडू तिच्या हातात.
४) पुढील काव्यपंक्तींतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दांत लिहा. (२)
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.
खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.
खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
| क्र. | मुद्दे | आश्वासक चित्र |
| 1. | प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
| 2. | कवितेचा विषय - | |
| 3. | शब्दांचे अर्थ लिहा. | i. झरोक - ______ |
| ii. कसब - ______ |
