English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

पत्रलेखन: खालील निवेदन वाचा व कृती सोडवा

Advertisements
Advertisements

Question

पत्रलेखन: खालील निवेदन वाचा व कृती सोडवा

Long Answer
Advertisements

Solution

विनंती पत्र – (औपचारिक)

दिनांक: ४ फेब्रुवारी २०२१

प्रति, माननीय श्री. रमेश पाटील

आयोजक- सुलेखन कार्यशाळा,

अक्षर पुस्तकालय, राजापेठ,

अमरावती ४०००१८

विषय: 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत होणाऱ्या सुलेखन कार्यशाळेत प्रवेश मिळण्याबाबत.'

माननीय महोदय, मी किरणकुमार बेलसरे, रमाई विद्यालयातील इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. मी आणि माझ्या वर्गातील काही विद्यार्थीमित्र अक्षर पुस्तकालय, राजापेठ, अमरावती आयोजित 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' अंतर्गत होणाऱ्या सुलेखन कार्यशाळेत सहभागी होण्यास इच्छुक आहोत. मागच्या सुट्टीत आपल्या पुस्तकालयामार्फत प्रकाशित 'सुलेखन – एक कला' हे पुस्तक आमच्या वाचनात आले होते. त्यातील बारकावे वाचून आम्ही प्रेरित झालो आहोत.

'सुंदर अक्षर हाच खरा दागिना' असे म्हटले जाते. आम्हांलाही आमचे अक्षर सुंदर, नीटनेटके व वळणदार करण्याची इच्छा आहे, म्हणून १२ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या आपल्या सुलेखन कार्यशाळेत आम्हांला सहभागी व्हायचे आहे. माझ्या वर्गातील माझ्यासह एकूण वीस विद्यार्थ्यांची यात सहभागी होण्याची इच्छा आहे.

माझ्या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी आपणांस विनंती करतो, की माझ्या वर्गातील २० विद्यार्थ्यांना या सुलेखन कार्यशाळेत सहभागी करून घ्यावे.

कळावे,

आपला विश्वासू,

किरणकुमार बेलसरे

विद्यार्थी प्रतिनिधी,

रमाई विद्यालय, ठाकूरनगर,

राजापेठ,

अमरावती, ४०००११

[email protected]

किंवा

अभिनंदन पत्र – (अनौपचारिक)

दिनांक: २८ फेब्रुवारी २०२१

प्रिय अक्षय,

सप्रेम नमस्कार.

विश्वास सर्वप्रथम तुझे मनापासून अभिनंदन!

अक्षर पुस्तकालय आयोजित सुलेखन कार्यशाळेत शेवटच्या दिवशी झालेल्या कौशल्य चाचणीत तू प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालास त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन!

अक्षर पुस्तकालयामार्फत राबवले जाणारे सर्वच उपक्रम स्तुत्य असतात. एक अभ्यासपूर्ण आयोजन करणारी संस्था म्हणून ती सर्वपरिचित आहे. अशा संस्थेच्या कार्यशाळेत सहभागी होणे ही खरंच भाग्याची गोष्ट आहे.

लहानपणापासून पाहतोय मी, तुझे अक्षर म्हणजे मोती. हे अक्षर आणखी सुंदर, रेखीव आणि सुबक बनवण्याकरता या सुलेखन वर्गाचा तुला निश्चितच फायदा झाला असेल.

तुझ्या या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. सुलेखन क्षेत्रात तुझे नाव उज्ज्वल करशील याची खात्री आहे मला. पुन्हा एकदा तुझे अभिनंदन!

तुझा मित्र,

किरणकुमार बेलसरे

२०३, वास्तू विठ्ठल,

ठाकूरनगर, राजापेठ,

अमरावती, ४०००११

[email protected]

shaalaa.com
पत्रलेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 20.3: उपयोजित लेखन - पत्रलेखन

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi Standard 10 Maharashtra State Board
Chapter 20.3 उपयोजित लेखन
पत्रलेखन | Q अ. १.
SCERT Maharashtra Marathi Kumarbharti (Second Language) [English] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 16.3 उपयोजित लेखन
स्वाध्याय | Q अ. १.

RELATED QUESTIONS

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहा.


1. पत्रलेखन:

पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून मा. उत्तम कांबळे यांना उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जीवनज्योती विद्यालय,

नांदगाव
कथाकथन स्पर्धा पारितोषिक
वितरण समारंभ
दि. २२ जुलै
वेळ : दुपारी ४ वा.

प्रमुख पाहुणे – मा. श्री. अजय लागू
अध्यक्ष : मा. श्री. उत्तम कांबळे

संपर्क – [email protected]

दीपक/दीपाली माने

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
पारितोषिक प्राप्त विद्यार्थी सुहास/सुनीता देसाई, यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जीवनज्योती विद्यालय,

नांदगाव
कथाकथन स्पर्धा पारितोषिक
वितरण समारंभ
दि. २२ जुलै
वेळ : दुपारी ४ वा.

प्रमुख पाहुणे – मा. श्री. अजय लागू
अध्यक्ष : मा. श्री. उत्तम कांबळे

संपर्क – [email protected]

दीपक/दीपाली माने

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून मा. उत्तम कांबळे यांना उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र लिहा.


पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

संत गाडगेबाबा विद्यालय, संतभूमी चौक, अमरावती.
शाळेच्या ‘विद्यार्थी मंडळ’ तर्फे आयोजित
‘एकपाती अभिनय स्पर्धा’
दि. 3 जानेवारी, स. 11 वा.
[email protected]
               - मुख्याध्यापक

अशोक/आशा पवार, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने स्पर्धेसाठी शाळेचे सभागृह उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

आदर्श विद्यालय
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा
स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित
गट क्र. 1 - इ. 5वीं ते इ. 7वीं
गर क्र. 2 - इ. 8वीं ते इ. 10वीं
स्पर्धेचे ठिकाण
आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह,
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
दि. 14 नोव्हेंबर

वेळ - सकाळी 9.00 ते 11.00
अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा

- मुख्याध्यापक

विद्यार्थी प्रमुख या नात्याने स्पर्धेत इ. 10वीं - अ या वर्गातील वीस विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मा. मुख्याध्यापकांना लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी
आयोजित
स्पर्धा - दि. 20 मार्च वेळ - स. 9 वाजता
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

पारितोषिक वितरण सोहळा
प्रमुख पाहुणे - श्री. विक्रम मेहेंदळे
अध्यक्षा - श्रीमती रेखा महाजन
स्थळ - हुतात्मा सभागृह, साखरवाडी
संपर्क - आयोजक, साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी.
E-mail - [email protected]
विनय/विनया देशमुख
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना वक्तृत्व
स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी
आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी
आयोजित
स्पर्धा - दि. 20 मार्च वेळ - स. 9 वाजता
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

पारितोषिक वितरण सोहळा
प्रमुख पाहुणे - श्री. विक्रम मेहेंदळे
अध्यक्षा - श्रीमती रेखा महाजन
स्थळ - हुतात्मा सभागृह, साखरवाडी
संपर्क - आयोजक, साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी.
E-mail - [email protected]
विनय/विनया देशमुख
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल मित्राला/मैत्रिणीला अभिनंदन करणारे पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!

  • दिनांक: ५ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर, २०१८
  • वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
  • सूचना: शाळांनी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
सहल प्रमुख या नात्याने
 तुमच्या शाळेला परवानगी मिळण्याबाबत पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

“आरोग्यम्‌ धनसंपदा”

टिळक स्पोर्ट्स

४३२, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०

सेल सेल सेल
खेळ सात दिवस चालू

आरोग्य चांगले रहण्यासाठी खेळासारखा व्यायाम पाहिजेच.

आमच्याकडे सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य माफक दरात मिळते.

भरपूर स्टॉक!

वेळ: सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत

अध्यक्ष क्रीडा क्लब या नात्याने
वरील जाहिरातीवरून आपल्या क्लबला क्रीडा-साहित्य पुरवण्यासाठी पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

स्थळ

गोखले नाट्यगृह,
मिरज

रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त

ऐतिहासिक नाट्य स्पर्धा

दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८

वेळ - रात्री: ९:३० ते १२:३०

प्रवेश - फक्त पासधारक*

नियम व अटी लागू.

नावनोंदणी
आवश्यक

तुमच्या नाटकासाठी
वरील स्पर्धेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

स्थळ

गोखले नाट्यगृह,
मिरज

रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त

ऐतिहासिक नाट्य स्पर्धा

दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८

वेळ - रात्री: ९:३० ते १२:३०

प्रवेश - फक्त पासधारक*

नियम व अटी लागू.

नावनोंदणी
आवश्यक

तुमच्या नाटकासाठी
तुमच्या मित्राला तुमचे नाटक पाहण्यास येण्याबाबत पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जनता विद्यालय

अहमदनगर

आयोजित

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा

दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता.

संपर्क- मुख्याध्यापक, जनता विद्यालय,

अहमदनगर.

E-mail - [email protected]

मोबाइल - 0211556680

अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जनता विद्यालय

अहमदनगर

आयोजित

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा

दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता.

संपर्क- मुख्याध्यापक, जनता विद्यालय,

अहमदनगर.

E-mail - [email protected]

मोबाइल - 0211556680

अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम आयोजनाबद्दल मुख्याध्यापकांना अभिनंदन करणारे पत्र लिहा.


वृत्तपत्रातील खालील बातमी वाचा व त्यखालील कृती सोडवा.

जागरूक नागरिक या नात्याने ‘फॅन्टसी लँड’ या उद्यानासमोरील रस्त्यावरील नादुरुस्त सिग्नल दुरुस्त केल्याबद्दल मा. वाहतूक अधिकारी यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


विद्यार्थी या नात्याने स्वतःसाठी तुमच्या आवडीच्या पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.


शालेय ग्रंथालय प्रमुख या नात्याने साफल्य बुक डेपोकडे पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.


संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा. 


संबंधित विषयासाठी स्व-परिचय पत्र तयार करा.

स्वपरिचय पत्राचे मुद्दे

(१) संपूर्ण नाव

(२) पत्ता

(३) संपर्क क्रमांक

(४) जन्मतारीख

(५) उंची, वजन

(६) शैक्षणिक पात्रता

(७) इतर आवडणारे खेळ

(८) पूर्वी प्राप्त केलेले यश


तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये काही वस्तू सदोष आढळल्या, याविषयी तक्रार करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा.


‘झाडे लावा........ झाडे जगवा.’

हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

रोपांचे मोफत वाटप

संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे

[email protected]

कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र ट्रस्टच्या व्यवस्थापकांना लिहा.


'झाडे लावा........ झाडे जगवा. '

हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

रोपांचे मोफत वाटप

संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे

[email protected]

कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाईट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.


योगेश/योगिता मोरे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्य खरेदीवर विशेष सवलत दिल्या- बद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.


योगेश/योगिता मोरे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×