English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

जीवनज्योती विद्यालय, नांदगाव कथाकथन स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ दि. २२ जुलै वेळ : दुपारी ४ वा. प्रमुख पाहुणे – मा. श्री. अजय लागू अध्यक्ष : मा. श्री. उत्तम कांबळे संपर्क

Advertisements
Advertisements

Question

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जीवनज्योती विद्यालय,

नांदगाव
कथाकथन स्पर्धा पारितोषिक
वितरण समारंभ
दि. २२ जुलै
वेळ : दुपारी ४ वा.

प्रमुख पाहुणे – मा. श्री. अजय लागू
अध्यक्ष : मा. श्री. उत्तम कांबळे

संपर्क – [email protected]

दीपक/दीपाली माने

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून मा. उत्तम कांबळे यांना उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र लिहा.

Writing Skills
Advertisements

Solution

दिनांक: १७ जुलै, २०२०

प्रति,

माननीय श्री. उत्तम कांबळे
२१५, स्वरा सोसायटी,
अगरवाल नगर,
महाड, रायगड - 400562
[email protected]

विषय: 'जीवनज्योती विद्यालयाच्या' कथाकथन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याबाबत.

माननीय महोदय,

मी दीपक माने, जीवनज्योती विद्यालय, नांदगावचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहीत आहे. दरवर्षी आमच्या शाळेमध्ये कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षपद आपण भूषवावे अशी आम्हां सर्वांची इच्छा आहे. आम्हां विद्यार्थ्यांना तुमचे विचार ऐकण्याची व मार्गदर्शन मिळवण्याची संधी यामुळे मिळेल.

तरी दिनांक २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता होणाऱ्या या समारंभास आपण अध्यक्ष म्हणून उपस्थित राहावे, अशी मी आपल्याला विनंती करतो. आपण या समारंभास उपस्थित राहून विजेत्यांना व आम्हां सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराल असा आम्हांला विश्वास वाटतो.

धन्यवाद!

आपला कृपाभिलाषी,
दीपक माने
जीवनज्योती विद्यालय,
नांदगाव, रत्नागिरी - 20486
[email protected]

shaalaa.com
पत्रलेखन
  Is there an error in this question or solution?
2019-2020 (March) Official

APPEARS IN

RELATED QUESTIONS

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहा.


पत्रलेखन: खालील निवेदन वाचा व कृती सोडवा


पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.


पत्रलेखन:- पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

संत गाडगेबाबा विद्यालय,
संतभूमी चौक, अमरावती.
शाळेच्या ‘विद्यार्थी मंडळ’
तर्फे आयोजित
‘एकपाती अभिनय स्पर्धा’
दि. 3 जानेवारी  स. 11 वा.
[email protected]
               - मुख्याध्यापक

अशोक/आशा पवार, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने प्रथम पारितोषिक प्राप्त स्पर्धक स्वाती/सुयश देसाई यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

आदर्श विद्यालय
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा
स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित
गट क्र. 1 - इ. 5वीं ते इ. 7वीं
गर क्र. 2 - इ. 8वीं ते इ. 10वीं
स्पर्धेचे ठिकाण
आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह,
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
दि. 14 नोव्हेंबर

वेळ - सकाळी 9.00 ते 11.00
अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा

- मुख्याध्यापक

विद्यार्थी प्रमुख या नात्याने तालुकास्तरावर आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मा. मुख्याध्यापक यांना त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

‘स्वच्छता हीच देशसेवा’

स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम

दि. २ ऑक्टोबर, सकाळी १०:०० वाजता

शालेय परिसर स्वच्छता

विद्यार्थी प्रतिनिधी
या नात्याने
उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

‘स्वच्छता हीच देशसेवा’

स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम

दि. २ ऑक्टोबर, सकाळी १०:०० वाजता

शालेय परिसर स्वच्छता

विद्यार्थी प्रतिनिधी
या नात्याने
स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र तुमच्या शाळेतील वरिष्ठ सेवकांना लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!

  • दिनांक: ५ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर, २०१८
  • वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
  • सूचना: शाळांनी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
सहल प्रमुख या नात्याने
 तुमच्या शाळेला परवानगी मिळण्याबाबत पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

स्थळ

गोखले नाट्यगृह,
मिरज

रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त

ऐतिहासिक नाट्य स्पर्धा

दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८

वेळ - रात्री: ९:३० ते १२:३०

प्रवेश - फक्त पासधारक*

नियम व अटी लागू.

नावनोंदणी
आवश्यक

तुमच्या नाटकासाठी
तुमच्या मित्राला तुमचे नाटक पाहण्यास येण्याबाबत पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

वाचाल तर वाचाल!

मनोज पुस्तकालय

69/314 आनंद नगर, अकोला

दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त

दि. 8 डिंसेबर रोजी खास सवलत

कोणत्याही पुस्तकावर
20% सवलत
2000 रुपयांच्या खरेदीवर
एक पुस्तक मोफत
वेळ
`↓`
स. 9.00 ते रात्री 8.00 वाजता
सोमवार बंद.
संपर्क - [email protected]

श्रेया/श्रेयस इनामदार विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहा.


विद्यार्थी या नात्याने स्वतःसाठी तुमच्या आवडीच्या पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.


शालेय ग्रंथालय प्रमुख या नात्याने साफल्य बुक डेपोकडे पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.


कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तू खरेदीची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा.


‘झाडे लावा........ झाडे जगवा.’

हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

रोपांचे मोफत वाटप

संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे

[email protected]

कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र ट्रस्टच्या व्यवस्थापकांना लिहा.


'झाडे लावा........ झाडे जगवा. '

हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

रोपांचे मोफत वाटप

संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे

[email protected]

कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाईट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारे पात्र व्यवस्थापकांना लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×