English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा

Advertisements
Advertisements

Question

पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.

Long Answer
Advertisements

Solution

मागणी पत्र – (औपचारिक)

दिनांक: ७ मार्च २०२१

प्रति,

माननीय श्री. गणपत भवरे

व्यवस्थापक-वनश्री,

कारंजा रोड,

वाशिम ४४४००३.

विषय: 'सहलीकरता माहिती पत्रकाची मागणी करण्याबाबत.'

माननीय महोदय,

मी स्नेहल विजयगड येथे राहत असून आपल्या वनश्री सहलीकरता पर्यटक म्हणून येण्यास उत्सुक आहे. आपल्या वनश्री विषयी अनेकांकडून आम्ही स्तुती ऐकली आहे. त्यामुळे, येथे भेट देण्याची उत्सुकता वाढली आहे.

आपले वनश्री पर्यटनस्थळ हे निसर्गसान्निध्यात रुचकर भोजन, खेळांच्या वैविध्यपूर्ण प्रकारांसाठी विशेष प्रसिद्ध असल्याचे ऐकले आहे. शहरी धावपळीपासून काही काळ निवांत जगण्यासाठी अशा ठिकाणी यायला आम्हांला निश्चितच आवडेल.

या सहलीसाठी मी आणि माझे संपूर्ण कुटुंब असे २५ लोक येऊ इच्छित आहोत; मात्र येण्यापूर्वी या ठिकाणची संपूर्ण माहिती देणारे माहिती पत्रक आम्हांला मिळाले, तर आम्हांला सहलीची रूपरेषा आखण्यास निश्चितच मदत होईल.

तरी एक उत्सुक पर्यटक या नात्याने मी आपणाकडे आपल्या वनश्री पर्यटनस्थळाविषयी सविस्तर माहिती देणाऱ्या माहितीपत्रकाची मागणी करण्यासाठी हे पत्र लिहिले आहे. लवकरच हे माहिती पत्रक आम्हांला मिळेल असा मला विश्वास आहे.

कळावे,

आपली कृपाभिलाषी,

स्नेहल, ४०,

जया निवास विजयगड, विक्रोळी

मुंबई, ४०००१९

[email protected]

किंवा

विनंती पत्र – (औपचारिक)

दिनांक: ८ मार्च २०२१

प्रति,

माननीय श्री. गणपत भवरे

व्यवस्थापक-वनश्री,

कारंजा रोड,

वाशिम, ४४४००३

विषय: 'शालेय सहलीकरता विद्यार्थ्यांना प्रवेशदरात सवलत मिळण्याबाबत.'

माननीय महोदय,

मी स्नेहल ज्ञानसंपदा विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहीत आहे. माझ्या शाळेतील १० वी च्या वर्गातील ७५ मुले आपल्या वनश्रीमध्ये पर्यटनाकरता येण्यास उत्सुक आहेत. शाळेच्या वतीने आयोजित केलेली ही सहल आम्हां विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच आहे. या सहलीकरता आम्हां विद्यार्थ्यांना प्रवेशदरात सवलत मिळाली, तर या सहलीमध्ये माझ्या आणखी विद्यार्थी मित्रांना सहभाग नोंदवता येईल. तरी शालेय विद्यार्थी म्हणून आम्हां सर्वांना प्रवेशदरात सवलत मिळावी अशी मी आपणांस विनंती करत आहे.

आपली विश्वासू,

स्नेहल 

विद्यार्थी प्रतिनिधी,

ज्ञानसंपदा विद्यालय,

जया निवास विजयगड, विक्रोळी

मुंबई, ४०००१९

[email protected]

shaalaa.com
पत्रलेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 20.3: उपयोजित लेखन - पत्रलेखन

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi Standard 10 Maharashtra State Board
Chapter 20.3 उपयोजित लेखन
पत्रलेखन | Q अ. २.
SCERT Maharashtra Marathi Kumarbharti (Second Language) [English] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 16.3 उपयोजित लेखन
स्वाध्याय | Q अ. २.

RELATED QUESTIONS

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहा.


1. पत्रलेखन:

पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून मा. उत्तम कांबळे यांना उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जीवनज्योती विद्यालय,

नांदगाव
कथाकथन स्पर्धा पारितोषिक
वितरण समारंभ
दि. २२ जुलै
वेळ : दुपारी ४ वा.

प्रमुख पाहुणे – मा. श्री. अजय लागू
अध्यक्ष : मा. श्री. उत्तम कांबळे

संपर्क – [email protected]

दीपक/दीपाली माने

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
पारितोषिक प्राप्त विद्यार्थी सुहास/सुनीता देसाई, यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जीवनज्योती विद्यालय,

नांदगाव
कथाकथन स्पर्धा पारितोषिक
वितरण समारंभ
दि. २२ जुलै
वेळ : दुपारी ४ वा.

प्रमुख पाहुणे – मा. श्री. अजय लागू
अध्यक्ष : मा. श्री. उत्तम कांबळे

संपर्क – [email protected]

दीपक/दीपाली माने

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून मा. उत्तम कांबळे यांना उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र लिहा.


पत्रलेखन: खालील निवेदन वाचा व कृती सोडवा


पत्रलेखन:- पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.


पत्रलेखन: खालील निवेदनाच्या आधारे कृती सोडवा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

संत गाडगेबाबा विद्यालय, संतभूमी चौक, अमरावती.
शाळेच्या ‘विद्यार्थी मंडळ’ तर्फे आयोजित
‘एकपाती अभिनय स्पर्धा’
दि. 3 जानेवारी, स. 11 वा.
[email protected]
               - मुख्याध्यापक

अशोक/आशा पवार, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने स्पर्धेसाठी शाळेचे सभागृह उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

संत गाडगेबाबा विद्यालय,
संतभूमी चौक, अमरावती.
शाळेच्या ‘विद्यार्थी मंडळ’
तर्फे आयोजित
‘एकपाती अभिनय स्पर्धा’
दि. 3 जानेवारी  स. 11 वा.
[email protected]
               - मुख्याध्यापक

अशोक/आशा पवार, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने प्रथम पारितोषिक प्राप्त स्पर्धक स्वाती/सुयश देसाई यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

आदर्श विद्यालय
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा
स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित
गट क्र. 1 - इ. 5वीं ते इ. 7वीं
गर क्र. 2 - इ. 8वीं ते इ. 10वीं
स्पर्धेचे ठिकाण
आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह,
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
दि. 14 नोव्हेंबर

वेळ - सकाळी 9.00 ते 11.00
अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा

- मुख्याध्यापक

विद्यार्थी प्रमुख या नात्याने तालुकास्तरावर आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मा. मुख्याध्यापक यांना त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

आदर्श विद्यालय
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा
स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित
गट क्र. 1 - इ. 5वीं ते इ. 7वीं
गर क्र. 2 - इ. 8वीं ते इ. 10वीं
स्पर्धेचे ठिकाण
आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह,
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
दि. 14 नोव्हेंबर

वेळ - सकाळी 9.00 ते 11.00
अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा

- मुख्याध्यापक

विद्यार्थी प्रमुख या नात्याने स्पर्धेत इ. 10वीं - अ या वर्गातील वीस विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मा. मुख्याध्यापकांना लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी
आयोजित
स्पर्धा - दि. 20 मार्च वेळ - स. 9 वाजता
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

पारितोषिक वितरण सोहळा
प्रमुख पाहुणे - श्री. विक्रम मेहेंदळे
अध्यक्षा - श्रीमती रेखा महाजन
स्थळ - हुतात्मा सभागृह, साखरवाडी
संपर्क - आयोजक, साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी.
E-mail - [email protected]
विनय/विनया देशमुख
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना वक्तृत्व
स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी
आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी
आयोजित
स्पर्धा - दि. 20 मार्च वेळ - स. 9 वाजता
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

पारितोषिक वितरण सोहळा
प्रमुख पाहुणे - श्री. विक्रम मेहेंदळे
अध्यक्षा - श्रीमती रेखा महाजन
स्थळ - हुतात्मा सभागृह, साखरवाडी
संपर्क - आयोजक, साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी.
E-mail - [email protected]
विनय/विनया देशमुख
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल मित्राला/मैत्रिणीला अभिनंदन करणारे पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

‘स्वच्छता हीच देशसेवा’

स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम

दि. २ ऑक्टोबर, सकाळी १०:०० वाजता

शालेय परिसर स्वच्छता

विद्यार्थी प्रतिनिधी
या नात्याने
स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र तुमच्या शाळेतील वरिष्ठ सेवकांना लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!

  • दिनांक: ५ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर, २०१८
  • वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
  • सूचना: शाळांनी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
सहल प्रमुख या नात्याने
तुमच्या मित्रास वस्तुसंग्रहालय पाहण्यास येण्यासाठी पत्र लिहा.

“आरोग्यम्‌ धनसंपदा”

टिळक स्पोर्ट्स

४३२, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०

सेल सेल सेल
खेळ सात दिवस चालू

आरोग्य चांगले रहण्यासाठी खेळासारखा व्यायाम पाहिजेच.

आमच्याकडे सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य माफक दरात मिळते.

भरपूर स्टॉक!

वेळ: सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत

अध्यक्ष क्रीडा क्लब या नात्याने
आपल्या मित्राला क्लबचे सामने पाहण्यासाठी येण्याबाबत पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जनता विद्यालय

अहमदनगर

आयोजित

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा

दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता.

संपर्क- मुख्याध्यापक, जनता विद्यालय,

अहमदनगर.

E-mail - [email protected]

मोबाइल - 0211556680

अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

वाचाल तर वाचाल!

मनोज पुस्तकालय

69/314 आनंद नगर, अकोला

दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त

दि. 8 डिंसेबर रोजी खास सवलत

कोणत्याही पुस्तकावर
20% सवलत
2000 रुपयांच्या खरेदीवर
एक पुस्तक मोफत
वेळ
`↓`
स. 9.00 ते रात्री 8.00 वाजता
सोमवार बंद.
संपर्क - [email protected]

श्रेया/श्रेयस इनामदार विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहा.


रक्तदान शिबिरात नागरिक या नात्याने तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहायचे आहे. त्यासाठी खालील निवेदन वाचा व त्याआधारे पत्राच्या प्रारूपात केवळ मुद्दे योग्य ठिकाणी लिहा.


वृत्तपत्रातील खालील बातमी वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जागरूक नागरिक या नात्याने ‘फॅन्टसी लँड’ या उद्यानासमोरील रस्त्यावर नवीन सिग्नलं यंत्रणा बसवून देण्याची मागणी करणारे पत्र मा. वाहतूक अधिकारी यांना लिहा.


वृत्तपत्रातील खालील बातमी वाचा व त्यखालील कृती सोडवा.

जागरूक नागरिक या नात्याने ‘फॅन्टसी लँड’ या उद्यानासमोरील रस्त्यावरील नादुरुस्त सिग्नल दुरुस्त केल्याबद्दल मा. वाहतूक अधिकारी यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा. 


संबंधित विषयासाठी स्व-परिचय पत्र तयार करा.

स्वपरिचय पत्राचे मुद्दे

(१) संपूर्ण नाव

(२) पत्ता

(३) संपर्क क्रमांक

(४) जन्मतारीख

(५) उंची, वजन

(६) शैक्षणिक पात्रता

(७) इतर आवडणारे खेळ

(८) पूर्वी प्राप्त केलेले यश


तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये काही वस्तू सदोष आढळल्या, याविषयी तक्रार करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा.


कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तू खरेदीची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा.


‘झाडे लावा........ झाडे जगवा.’

हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

रोपांचे मोफत वाटप

संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे

[email protected]

कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र ट्रस्टच्या व्यवस्थापकांना लिहा.


'झाडे लावा........ झाडे जगवा. '

हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

रोपांचे मोफत वाटप

संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे

[email protected]

कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाईट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.


योगेश/योगिता मोरे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्य खरेदीवर विशेष सवलत दिल्या- बद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×