English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

मुद्दे'स्वप्न करू साकार'1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री 2. प्रस्तुत कवितेचा विषय 3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा.'हजार आम्ही एकी बळकटसर्वांचे हो एकच मनगट।

Advertisements
Advertisements

Question

खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे 'स्वप्न करू साकार'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
2. प्रस्तुत कवितेचा विषय  
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'हजार आम्ही एकी बळकट।
सर्वांचे हो एकच मनगट।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. विभव -
ii. मंगल -
iii. श्रम -
iv. हस्त -
Chart
Advertisements

Solution

मुद्दे 'स्वप्न करू साकार'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री किशोर पाठक
2. प्रस्तुत कवितेचा विषय देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. आम्ही भारतीय संख्येने अगणित आहोत तरी आमची एकता अखंड आहे. आमच्या मनगटात एकीची शक्ती आहे.
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण हे समूहगीत साध्या, सोप्या भाषेत देशातील शेतीसंस्कृती, श्रमांचे महत्त्व व एकता या मूल्यांवर भर देते. आपल्या देशाची भरभराट व्हावी, विकास व्हावा असा शुभ विचार व्यक्त करतानाच आपण सर्वांनी या कार्यात पुढाकार घेऊया असा प्रयत्नवादी दृष्टिकोन कवी मांडतात. ही कविता उत्साही भाव व सकारात्मकता निर्माण करते. यमक साधणारी, तालबद्ध रचना असल्यामुळे ती लयीत गाता येते. सर्व देशवासियांना देश घडवण्याची प्रेरणा देणारी ही कविता मला फारच आवडते.
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. विभव - ऐश्वर्य/संपत्ती
ii. मंगल - पवित्र
iii. श्रम - कष्ट
iv. हस्त - हात
shaalaa.com
स्वप्न करू साकार
  Is there an error in this question or solution?
2019-2020 (March) Official

RELATED QUESTIONS

खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.

श्रमशक्तीचे मंत्र- 


खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.

हस्त शुभंकर - 


खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.

आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार-


आकृतिबंध पूर्ण करा.


आकृतिबंध पूर्ण करा.


खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा.

शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।
घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।


कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा.


खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा.

शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।


पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)

आकलन कृती

 १. जोड्या जुळवा. (०२)

क्र. 'अ' 'ब'
१. सुदर्शन चक्र शुभंकर
२. मंत्र शक्ती
३. नौबत चैतन्य
४. हस्त श्रमशक्ती

 

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

फुलामुलांतून हसतो श्रावण

मातीचे हो मंगल तनमन

चैतन्याचे फिरे सुदर्शन

शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।

या हातांनी यंत्र डोलते

श्रमशक्तीचे मंत्र बोलते

उद्योगाचे चक्र चालते

आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।।

हजार आम्ही एकी बळकट

सर्वांचे हो एकच मनगट

शक्तीचीही झडते नौबत

घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।

या विश्वाची विभव संपदा

जपू वाढवू आम्ही लाखदा

हस्त शुभंकर हवा एकदा

भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।

२. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

१. कोणाचे स्वप्न साकार करायचे आहे?

२. शेतातील धान्याला कशाची उपमा दिली आहे?

३. कवितेत आलेल्या खालील शब्दांचा अर्थ लिहा. (०२)

१. मंगल -

२. तन -

३. ललकार -

४. विभव -

४. खालील पंक्तींमधून सूचित होणारा अर्थ लिहा. (०२)

या विश्वाची विभव संपदा

जपू वाढवू आम्ही लाखदा

भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।


खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुददे 'अंकिला मी दास तुझा' किंवा 'स्वप्न करू साकार'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री    
2. प्रस्तुत कवितेचा विषय    
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'अग्निमाजि पडे बाळू । माता धांवें कनवाळू।।' 'हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण    
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. काज - 
ii. सवें -
iii. पाडस -
iv. धेनू -
i. विभव -
ii. मंगल -
iii. श्रम -
iv. हस्त -

किंवा

मुददे 'स्वप्न करू साकार'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
2. प्रस्तुत कवितेचा विषय  
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. विभव -
ii. मंगल -
iii. श्रम -
iv. हस्त -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) शुभंकर -
(ii) उज्जवल -
(iii) विभव -
(iv) अमुचा -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -  
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -  
(3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. ‘या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार’
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. (i) ललकारणे -
(ii) नौबत - 
(iii) विभव - 
(iv) श्रम - 

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

कृती ‘स्वप्न करू साकार’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -   
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -   
(3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -   
(4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ - 

‘या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार’

(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ -  (i) विभव -
(ii) शक्ती -
(iii) विश्‍व -
(iv) हस्त -

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×