English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कृती ‘स्वप्न करू साकार’ (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - (2) प्रस्तुत कवितेचा विषय - (3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

कृती ‘स्वप्न करू साकार’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -   
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -   
(3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -   
(4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ - 

‘या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार’

(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ -  (i) विभव -
(ii) शक्ती -
(iii) विश्‍व -
(iv) हस्त -
Complete the Table
Advertisements

Solution

कृती ‘स्वप्न करू साकार’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -  किशोर पाठक
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -  देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न साकार करण्यासाठी यंत्रशक्ती, कृषिसंस्कृती, आणि औद्योगिक क्रांतीच्या सहाय्याने मातृभूमीचा जागतिक पातळीवर नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करणे.
(3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -  कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण : प्रस्तुत कविता सकारात्मक प्रेरणा देणारी आहे. कवीने नव्या पिढीच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत कृषिविकास, औद्योगिक प्रगती आणि संस्कृती संवर्धनाच्या माध्यमातून राष्ट्राची सर्वांगीण उन्नती साधण्याचे मार्ग उलगडून दाखवले आहेत. ऐक्याच्या बळावर भारत सर्वांगीण प्रगती करून जागतिक पातळीवर प्रसिद्ध होईल, असा आशावाद कवीने या कवितेत व्यक्त केला आहे. विचारसौंदर्य, गेयता, लयबद्धता, भावसौंदर्य, प्रसाद व माधुर्य या विशेष गुणांमुळे ही कविता मला खूप आवडते.
(4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ - 
देशाभिमानाने प्रेरित होऊन कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याविषयी आशावादी दृष्टिकोन मांडला आहे. कवी म्हणतो की, या देशाच्या मातीवर जन्मत:च आमचा अधिकार आहे. येथे धर्म, पंथ, भाषा या बाबतीत विविधता असूनही राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे. लोकशाहीमुळे या मातीवर सर्वांचा समान अधिकार आहे. या एकात्मतेच्या बळावर आम्ही सर्वजण, नव्या पिढीचे आणि नवीन युगाचे स्वप्न साकार करू.
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ -  (i) विभव - ऐश्वर्य, संपत्ती
(ii) शक्ती -  ऊर्जा, सामर्थ्य
(iii) विश्‍व - जग
(iv) हस्त - हात
shaalaa.com
स्वप्न करू साकार
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official

RELATED QUESTIONS

खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.

श्रमशक्तीचे मंत्र- 


खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.

आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार-


आकृतिबंध पूर्ण करा.


खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।


खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा.

शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।
घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।


या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दांत लिहा.


कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा.


खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा.

शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।


कवितेसंबंधी खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८)

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

फुलामुलांतून हसतो श्रावण

मातीचे हो मंगल तनमन

चैतन्याचे फिरे सुदर्शन

शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।

या हातांनी यंत्र डोलते

श्रमशक्तीचे मंत्र बोलते

उद्योगाचे चक्र चालते

आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।।

हजार आम्ही एकी बळकट

सर्वांचे हो एकच मनगट

शक्तीचीही झडते नौबत

घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।

या विश्वाची विभव संपदा

जपू वाढवू आम्ही लाखदा

हस्त शुभंकर हवा एकदा

भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।

१. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री- (०१)

२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)

३. दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. (०२)

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

४. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश- (०२)

५. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे- (०२)

६. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचा अर्थ लिहा. (०२)

१. चैतन्य

२. श्रम

३. उद्योग

४. उत्क्रांती


खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे 'स्वप्न करू साकार'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
2. प्रस्तुत कवितेचा विषय  
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'हजार आम्ही एकी बळकट।
सर्वांचे हो एकच मनगट।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. विभव -
ii. मंगल -
iii. श्रम -
iv. हस्त -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा.

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘फुलामुलांतून हसतो श्रावण।
मातीचे हो मंगल तनमन।।’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) संपदा -
(ii) बळकट - 
(iii) उत्क्रांती - 
(iv) चैतन्य -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) शुभंकर -
(ii) उज्जवल -
(iii) विभव -
(iv) अमुचा -

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. शक्तीचीही झडते - ______
  2. चैतन्याचे फिरे - ______

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

फुलामुलांतून हसतो श्रावण
मातीचे हो मंगल तनमन
चैतन्याचे फिरे सुदर्शन
शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।

या हातांनी यंत्र डोलते
श्रमशक्तीचे मंत्र बोलते
उद्योगाचे चक्र चालते
आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।।

हजार आम्ही एकी बळकट
सर्वांचे हो एकच मनगट
शक्तीचीही झडते नौबत
घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।

या विश्वाची विभव संपदा
जपू वाढवू आम्ही लाखदा
हस्त शुभंकर हवा एकदा
भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

  1. बळकट - 
  2. आभाळ -
  3. संपदा -
  4. अपरंपार -

४. काव्यसौंदर्य: (2)

‘घराघरांतून जन्म घेतले तेज नवा अवतार।’ या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -  
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -  
(3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. ‘या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार’
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. (i) ललकारणे -
(ii) नौबत - 
(iii) विभव - 
(iv) श्रम - 

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×