English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

मुद्दे ‘दोन दिवस’ (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - (2) प्रस्तुत कवितेचा विषय - (3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. ‘हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले’

Advertisements
Advertisements

Question

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘दोन दिवस’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -  
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -  
(3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. ‘हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले’
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. (i) जिंदगी -
(ii) बरबाद - 
(iii) हरघडी - 
(iv) दुनिया - 
Chart
Advertisements

Solution

मुद्दे ‘दोन दिवस’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - कवी - नारायण सुर्वे
(2) प्रस्तुत कवितेचा विषय - कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रदर्शन
(3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. कामगारांसाठी कष्टकऱ्यांसाठी त्यांचे हातच सर्वकाही असतात याच हातांनी ते कष्ट करून आपले पोट भरत असतात त्यांचा उदरनिर्वाह या हातावरच अवलंबून असतो. हातांनी कष्ट केले तरच पोटाला भाकरी मिळेल मात्र या हातांनी कितीही कष्ट केले तरीदेखील कामगारांचे जीवन दुखी व दारिद्र्यातच असते. हातांनी कितीही कष्ट उपसले तरीदेखील हाती काहीच लागत नाही. दारिद्र्य पाठ सोडत नाही जणूकाही कष्टकऱ्यांचे हात दारिद्र्याकडे गहाणच राहिले आहेत.
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण 'दोन दिवस' या कवितेत कवी नारायण सुर्वे यांनी मांडलेले कामगारांचे भावविश्व जीवनाचा एक वेगळाच पैलू दाखवते. अडीअडचणींच्या काळातही जीवनाकडे पाहण्याचा आशादायी व सकारात्मक दृष्टिकोन देते. कवीने साध्या-सोप्या भाषेत जगण्याचे तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडले आहे. ही गद्याशी नाते सांगणारी निवेदनात्मक लेखनशैली मला फार आवडली. जीवनाचे धगधगीत वास्तव रेखाटतानाही कामगाराचे जीवन जगण्यावरील प्रेम कायम आहे, ते प्रेम टिपणारी ही कविता मला फार आवडते.
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. (i) जिंदगी - आयुष्य, जीवन
(ii) बरबाद - नष्ट, नाश
(iii) हरघडी - प्रत्येक वेळी
(iv) दुनिया - जग, विश्व
shaalaa.com
दोन दिवस
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (March) Official

RELATED QUESTIONS

खालील ओळींचे रसग्रहण करा. 

दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.

कृती पूर्ण करा.

‘रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत’ या आशयाची कवितेतील ओळ शोधा.

कृती पूर्ण करा.

कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा.

एका शब्दांत उत्तर लिहा.

कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट - ______

एका शब्दांत उत्तर लिहा.

कवीचा जवळचा मित्र - ______

खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’

‘दु:ख पेलावे आणि पुन्हा जगावे’, या वाक्यामागील तुम्हांला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.

खालील शब्दसमूहाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात - 

पुढील कवितेच्या त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८)

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो

दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

मुद्दे:

१. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री- (०१)

२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)

३.कवितेतील दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा. (०२)

‘शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.’

४. कवितेत आलेल्या शब्दांचे अर्थ लिहा. (०२)

१. रात्र -

२. साहाय्य -

३. शेकावे -

४. चंद्र -

५. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - (०२)

खालील ओळींचे रसग्रहण करा.

दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो.
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. दारिद्र्याकडे गहाण पडलेले - ______
  2. कवीचा जवळचा मित्र - ______

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

  1. फुलले - 
  2. धुंद -
  3. झोतभट्टी - 
  4. पोलाद - 

४. काव्यसौंदर्य: (2)

‘हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’, या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा.

मुद्दे ‘दोन दिवस’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘झोतभट्टीत शेकावे पोलाद। तसे आयुष्य छान शेकले।।’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) वाळविले -
(ii) पेलावे - 
(iii) हरघडी - 
(iv) अगा -

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. दोन दिवस वाट पाहण्यात गेले; तर दोन गेले - ______
  2. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी झाली - ______

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

  1. गहाण - 
  2. डोईवर - 
  3. झेतभट्टी -
  4. धुंद -

४. काव्या सौंदर्य: (2)

“दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलों”

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×