Advertisements
Advertisements
Question
कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
Advertisements
Solution
| कंदील: | फार दिवसांनी भेट झाली आपली! कशी आहेस तू? |
| विजेरी: | मी बरी आहे. पण तू इथे काय करतोस? तुझी आता गरज उरली नाही. |
| कंदील: | असे का म्हणतेस? तुझे नि माझे एकच तर कार्य आहे. स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देणे. |
| विजेरी: | ते ठीक आहे. पण तू अगदी जुनापुराणा झालास. तुला पेटवताना किती कष्ट पडतात. मी पाहा, एक बटन दाबले की लांबवर झोत पडतो. |
| कंदील: | हो. पण तुझा प्रकाश डोळ्यांना त्रास देतो. मी अगदी मंद तेवतो! |
| विजेरी: | तू तर उगाचच मिणमिणतोस. माझ्या प्रकाशाचा झगमगाट तर बघ. कशी लखलखते मी! |
| कंदील: | अग, तुला सेल लागतात पेटवायला. ते गेले की तुझा खेळ समाप्त! मी तर अखंड तेवत राहतो. |
| विजेरी: | तुलाही तेल लागतंच की! तेल घाला, वात ठेवा. ती भिजवा. तेव्हा कुठे तू पेटतोस! |
| कंदील: | माझ्याकडे तेल आहे. खरंच! तेलाला स्नेह म्हणतात. फार प्राचीन काळापासून माझा व माणसांचा स्नेहबंध आहे. |
| विजेरी: | हो. पण काळ बदलला. आता तुझी गरज नाही. |
| कंदील: | असे म्हणू नकोस! प्रकाश देणे आपले व्रत आहे. आपल्या दोघांचेही कार्य एकच आहे. आपल्या कार्याचा विसर पडू देता कामा नये! |
| विजेरी: |
“तुमचं म्हणणं अगदी पटलं मला. खरं तर मी तंत्रज्ञानामुळे वेगाने धावू शकते, पण तुमच्यात जो ‘स्नेह’ आणि संयम आहे, तो माझ्याकडे नाही. मी फक्त समोरच्याला रस्ता दाखवते, पण तुम्ही संपूर्ण परिसर उजळून टाकता.” |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील निवेदन वाचा व संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.
|
महात्मा फुले विद्यालय बुलढाणा नाट्यविभाग प्रमुख अंतिम दिनांक दि.२६ डिसेंबर |
|
पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक |
|
स्वपरिचय पत्राचे मुद्दे (१) संपूर्ण नाव (२) पत्ता (३) संपर्क क्रमांक (४) जन्मतारीख (५) शैक्षणिक पात्रता/विशेष प्रशिक्षण (६) छंद (७) अनुभव/पारितोषिक (८) इतर कलांमधील प्रावीण् |

कार्यक्रमाची तिकिटे संपल्यामुळे हाच कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची मागणी करणारे पत्र लिहा.

घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबाबत संबंधित व्यक्तिकडे तक्रार करा.
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.
|
२६ जानेवारी, भारताचा गणतंत्र दिन. अर्णव स्वच्छ शालेय गणवेशात तयार होऊन शाळेत गेला. माननीय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु झाला. विद्यार्थ्यांनी ध्वजवंदन केले. राष्ट्रगीत, ध्वजगीत, देशभक्तीपर गीत सादर केले. अध्यक्षांच्या प्रेरणादायी भाषणानंतर अर्णवचे देशभक्तीचा संदेश देणारे व देशभक्ताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे भाषण झाले. वृक्षारोपण, खाऊवाटप झाल्यानंतर मुले घरी जायला निघाली. अर्णवदेखील आपली तीनचाकी सायकल घेऊन निघाला. सावकाशपणे हुतात्मा चौकापर्यंत पोहोचला. लाल दिव्याचा संकेत मिळताच जागेवरच थांबला. चौकात खूप गर्दी होती. अनेक छोटी मुलं हातात छोटे तिरंगी झेंडे घेऊन पालकांच्या वाहनांवर बसली होती. हिरवा दिवा दिसताच थांबलेली गर्दी पुढे सरकली. अर्णवनेही हाताने चाकाला वेग दिला. एवढ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारं असं..... |
- तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या व तात्पर्य लिहा.
- तुम्ही कथा तयार करताना व लिहिताना कोण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या, त्यांची यादी करा.
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

(अ) चौकट पूर्ण करा.

(आ) जाहिरातीतील काही मजकूर चुकीचा वाटतो का? सकारण नमूद करा.
(इ) वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?
खालील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरुपात पुनर्लेखन करा.

खाली दिलेल्या बातमीच्या मथळ्यावरून आकर्षक जाहिरात तयार करा.
‘पाठ्यपुस्तकेतर पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील.’
प्रसंगलेखन-
खालील बातमी वाचा.

वरील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता. त्या भावपूर्ण प्रसंगाचे लेखन करा.
आत्मकथन-
खालील दिलेला महामार्गावरील सूचनाफलक तुमच्याशी बोलतो आहे, अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मकथन लिहा.
|
♦ वाहने हळू चालवा. |
गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या तुमच्या मित्राची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

कृती करा.

खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

शब्दजाल पूर्ण करा.

खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?
खाली दिलेल्या शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा.
शब्द - छत्री, रेनकोट, पाऊस
खालील बातमी वाचा.

वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
