Advertisements
Advertisements
Question
खालील निवेदन वाचा व संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.
|
महात्मा फुले विद्यालय बुलढाणा नाट्यविभाग प्रमुख अंतिम दिनांक दि.२६ डिसेंबर |
|
पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक |
|
स्वपरिचय पत्राचे मुद्दे (१) संपूर्ण नाव (२) पत्ता (३) संपर्क क्रमांक (४) जन्मतारीख (५) शैक्षणिक पात्रता/विशेष प्रशिक्षण (६) छंद (७) अनुभव/पारितोषिक (८) इतर कलांमधील प्रावीण् |
Advertisements
Solution
दि. २० डिसेंबर २०१९.
प्रति,
अ. ब. क.
माननीय नाट्यविभाग प्रमुख,
महात्मा फुले विद्यालय, बुलढाणा
विषयः एकपात्री प्रयोग कलाकार निवडीसाठी अर्ज.
महोदय, मी प्रिया पाटील, इयत्ता ९ वी ची विद्यार्थिनी, आपणांस सदर पत्र लिहित आहे. आंतरशालेय नाट्यमहोत्सवातील स्पर्धांसाठी एकपात्री प्रयोग कलाकारांच्या निवडीबाबतचे निवेदन सूचनाफलकावर वाचले. मला यात सहभागी होण्याची खूप इच्छा आहे, म्हणून हा अर्ज पाठवत आहे.
सोबत स्व-परिचय पत्र व पासपोर्ट आकाराचे दोन फोटो जोडत आहे.
आपली विश्वासू,
प्रिया पाटील
१२, सुलाभ अपार्टमेंट,
ता. जळगाव,
[email protected]
| स्वपरिचय पत्र |
|
वैयक्तिक माहिती: नाव: प्रिया राजू पाटील. पत्ता: १२, सुलाभ अपार्टमेंट, ता. जळगाव संपर्क क्रमांक: xxxxxxxx ई-मेल: [email protected] जन्मतारीख: ७ फेब्रुवारी २०१२ शैक्षणिक पात्रता/ विशेष प्रशिक्षण: १. ८ वी उत्तीर्ण (७५%) गुण. इयत्ता नववीत शिकत आहे. छंद: अभिनय, गायन, नृत्यकला, वाचन, चित्रकला अनुभव: इतर कलांमधील प्रावीण्य: १. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची शास्त्रीय गायन 'प्रवेशिका प्रथम' परीक्षा उत्तीर्ण. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS

घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबाबत संबंधित व्यक्तिकडे तक्रार करा.
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.
|
२६ जानेवारी, भारताचा गणतंत्र दिन. अर्णव स्वच्छ शालेय गणवेशात तयार होऊन शाळेत गेला. माननीय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु झाला. विद्यार्थ्यांनी ध्वजवंदन केले. राष्ट्रगीत, ध्वजगीत, देशभक्तीपर गीत सादर केले. अध्यक्षांच्या प्रेरणादायी भाषणानंतर अर्णवचे देशभक्तीचा संदेश देणारे व देशभक्ताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे भाषण झाले. वृक्षारोपण, खाऊवाटप झाल्यानंतर मुले घरी जायला निघाली. अर्णवदेखील आपली तीनचाकी सायकल घेऊन निघाला. सावकाशपणे हुतात्मा चौकापर्यंत पोहोचला. लाल दिव्याचा संकेत मिळताच जागेवरच थांबला. चौकात खूप गर्दी होती. अनेक छोटी मुलं हातात छोटे तिरंगी झेंडे घेऊन पालकांच्या वाहनांवर बसली होती. हिरवा दिवा दिसताच थांबलेली गर्दी पुढे सरकली. अर्णवनेही हाताने चाकाला वेग दिला. एवढ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारं असं..... |
- तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या व तात्पर्य लिहा.
- तुम्ही कथा तयार करताना व लिहिताना कोण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या, त्यांची यादी करा.
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

(अ) चौकट पूर्ण करा.

(आ) जाहिरातीतील काही मजकूर चुकीचा वाटतो का? सकारण नमूद करा.
(इ) वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?
खालील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरुपात पुनर्लेखन करा.

खाली दिलेल्या बातमीच्या मथळ्यावरून आकर्षक जाहिरात तयार करा.
‘पाठ्यपुस्तकेतर पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील.’
दिलेल्या सूचना वाचा व तुम्ही व तुमचा मित्र यांच्यातील संवाद लिहा.
|
विद्यार्थ्यांसाठी सूचना जागतिक पर्यावरणदिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन इच्छुक विद्यार्थ्यांनी २५ एप्रिलपर्यंत वर्गशिक्षकांकडे आपली नावे नोंदवावीत व ५ जूनला सकाळी ७.३० ला शाळेत जमावे. टीप:- येताना उन्हाळी सुट्टीत जमवलेल्या फळबिया सोबत आणाव्यात. |
प्रसंगलेखन-
खालील बातमी वाचा.

वरील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता. त्या भावपूर्ण प्रसंगाचे लेखन करा.
आत्मकथन-
खालील दिलेला महामार्गावरील सूचनाफलक तुमच्याशी बोलतो आहे, अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मकथन लिहा.
|
♦ वाहने हळू चालवा. |
खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा.

कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या तुमच्या मित्राची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

कृती करा.

खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

शब्दजाल पूर्ण करा.

खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?
खाली दिलेल्या शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा.
शब्द - छत्री, रेनकोट, पाऊस
खालील बातमी वाचा.

वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
शब्दसमूह, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर करून उतारा तयार करा.
