Advertisements
Advertisements
Question
आत्मकथन-
खालील दिलेला महामार्गावरील सूचनाफलक तुमच्याशी बोलतो आहे, अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मकथन लिहा.
|
♦ वाहने हळू चालवा. |
Advertisements
Solution
मी महामार्गावरील सूचनाफलक बोलतो आहे...
’हे समस्त मानवप्राण्यांनो, आमची निर्मिती तुम्हांला संकटातून वाचवण्यासाठी झाली आहे; पण हे सांगण्याची पाळी आमच्यावरच यावी यासारखी दु:खाची बाब नाही. आम्हांला रंगरंगोटी करून रस्त्यांवर लावले जाते ते केवळ शोभेसाठी नव्हे. त्यावर लिहिलेला संदेश वाचा. त्यानुसार आचरण करा तरच तुम्ही व इतर लोकही सुरक्षित राहतील.
बाबांनो, वाहने चालवताना ती हळू चालवा. 'अति घाई संकटात नेई' म्हणतात ते उगाच नाही. वेळेपेक्षा दहा मिनिटे लवकर निघा रे. घाटात मी उभा असतो 'पुढे एक किलोमीटरचा घाट आहे' या सूचनेसह. तरीही अपघात घडतात. सुरक्षित प्रवास ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, म्हणून 'गरज पडेल तेव्हा कर्णभोंगा वाजवा', 'गतिरोधकावर वाहनाची गती कमी करा' या आणि अशा अनेक सूचनांचे पालन करा. त्या तुमचे प्राण वाचवतील याची खात्री मी देतो.
आजकाल तर तुमच्या मोबाईलने (भ्रमणध्वनीने) कित्येकांचे जीव घेतले असतील. जर भ्रमणध्वनीवर बोलायचेच असेल, तर गाडी बाजूला थांबवून बोला. अन्यथा गाडी चालवताना भ्रमणध्वनी बंद करून ठेवा. त्याने तुमचे व समोरच्याचेही प्राण वाचतात. लक्षात ठेवा, 'नाही पेक्षा उशीर बरा!' त्यामुळे या सूचना वेळोवेळी पाळा व अपघात कायमचे टाळा.
बाळांनो, माझ्याकडे हात-पाय असते ना, तर येणाऱ्या या संकटांपासून मीच तुम्हांला वाचवले असते; पण माझ्याकडे फक्त तुम्हांला एका जागी उभे राहून सूचना देण्यापलीकडे काही नाही. तुम्ही तुमच्या कर्तव्यांकडे डोळेझाक करू नका म्हणजे निरपराधांचे व स्वत:चे प्राण वाचतील आणि माझ्याही अस्तित्वाला अर्थ मिळेल. चला, काळजी घ्या.“
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील निवेदन वाचा व संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.
|
महात्मा फुले विद्यालय बुलढाणा नाट्यविभाग प्रमुख अंतिम दिनांक दि.२६ डिसेंबर |
|
पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक |
|
स्वपरिचय पत्राचे मुद्दे (१) संपूर्ण नाव (२) पत्ता (३) संपर्क क्रमांक (४) जन्मतारीख (५) शैक्षणिक पात्रता/विशेष प्रशिक्षण (६) छंद (७) अनुभव/पारितोषिक (८) इतर कलांमधील प्रावीण् |

कार्यक्रमाची तिकिटे संपल्यामुळे हाच कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची मागणी करणारे पत्र लिहा.

घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबाबत संबंधित व्यक्तिकडे तक्रार करा.
खालील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरुपात पुनर्लेखन करा.

खाली दिलेल्या बातमीच्या मथळ्यावरून आकर्षक जाहिरात तयार करा.
‘पाठ्यपुस्तकेतर पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील.’
दिलेल्या सूचना वाचा व तुम्ही व तुमचा मित्र यांच्यातील संवाद लिहा.
|
विद्यार्थ्यांसाठी सूचना जागतिक पर्यावरणदिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन इच्छुक विद्यार्थ्यांनी २५ एप्रिलपर्यंत वर्गशिक्षकांकडे आपली नावे नोंदवावीत व ५ जूनला सकाळी ७.३० ला शाळेत जमावे. टीप:- येताना उन्हाळी सुट्टीत जमवलेल्या फळबिया सोबत आणाव्यात. |
खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा.

कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या तुमच्या मित्राची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

कृती करा.

खाली दिलेल्या शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा.
शब्द - छत्री, रेनकोट, पाऊस
खालील बातमी वाचा.

वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
शब्दसमूह, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर करून उतारा तयार करा.
