हिंदी

खालील निवेदन वाचा व संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील निवेदन वाचा व संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.

महात्मा फुले विद्यालय बुलढाणा
आंतरशालेय नाट्यमहोत्सवातील स्पर्धांसाठी
एकपात्री प्रयोग कलाकारांची निवड
इच्छुक विद्यार्थ्यांकडून स्व-परिचयपत्र
मागविण्यात येत आहे.

नाट्यविभाग प्रमुख

अंतिम दिनांक दि.२६ डिसेंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक

 

स्वपरिचय पत्राचे मुद्दे

(१) संपूर्ण नाव          

(२) पत्ता                 

(३) संपर्क क्रमांक    

(४) जन्मतारीख        

(५) शैक्षणिक पात्रता/विशेष प्रशिक्षण

(६) छंद

(७) अनुभव/पारितोषिक

(८) इतर कलांमधील प्रावीण्

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

दि. २० डिसेंबर २०१९.

प्रति,
अ. ब. क.
माननीय नाट्यविभाग प्रमुख,
महात्मा फुले विद्यालय, बुलढाणा

विषयः एकपात्री प्रयोग कलाकार निवडीसाठी अर्ज.

महोदय, मी प्रिया पाटील, इयत्ता ९ वी ची विद्यार्थिनी, आपणांस सदर पत्र लिहित आहे. आंतरशालेय नाट्यमहोत्सवातील स्पर्धांसाठी एकपात्री प्रयोग कलाकारांच्या निवडीबाबतचे निवेदन सूचनाफलकावर वाचले. मला यात सहभागी होण्याची खूप इच्छा आहे, म्हणून हा अर्ज पाठवत आहे.
सोबत स्व-परिचय पत्र व पासपोर्ट आकाराचे दोन फोटो जोडत आहे.

आपली विश्वासू,
प्रिया पाटील
१२, सुलाभ अपार्टमेंट,
ता. जळगाव,
[email protected]

स्वपरिचय पत्र

वैयक्तिक माहिती:

नाव: प्रिया राजू पाटील.

पत्ता: १२, सुलाभ अपार्टमेंट, ता. जळगाव

संपर्क क्रमांक: xxxxxxxx

ई-मेल:  [email protected]

जन्मतारीख: ७ फेब्रुवारी २०१२

शैक्षणिक पात्रता/ विशेष प्रशिक्षण:

१. ८ वी उत्तीर्ण (७५%) गुण. इयत्ता नववीत शिकत आहे.
२. गेली ३ वर्षे 'अभिनव' या नाट्यप्रशिक्षण संस्थेत नाट्यविषयक प्रशिक्षण घेत आहे.
३. 'कलामंच' आयोजित विविध कार्यशाळांत सहभाग.

छंद: अभिनय, गायन, नृत्यकला, वाचन, चित्रकला

अनुभव:
१. शालेय नाट्यस्पर्धांत सहभाग व उत्कृष्ट नायिकेचे पारितोषिक प्राप्त.
२. नाट्य प्रशिक्षण संस्थेमार्फत सलग दोन वर्षे एकपात्री प्रयोगांत सहभाग व मागील वर्षी प्रथम पुरस्कार प्राप्त.

इतर कलांमधील प्रावीण्य:

१. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची शास्त्रीय गायन 'प्रवेशिका प्रथम' परीक्षा उत्तीर्ण.
२. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय पारितोषिक प्राप्त.
३. 'काव्यवाचन: २०१७' स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त.

shaalaa.com
उपयोजित लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 16.3: उपयोजित लेखन - पत्रलेखन [पृष्ठ ६४]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 16.3 उपयोजित लेखन
पत्रलेखन | Q १. | पृष्ठ ६४

संबंधित प्रश्न

घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबाबत संबंधित व्यक्तिकडे तक्रार करा.


खालील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरुपात पुनर्लेखन करा.


खाली दिलेल्या बातमीच्या मथळ्यावरून आकर्षक जाहिरात तयार करा.

‘पाठ्यपुस्तकेतर पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील.’


दिलेल्या सूचना वाचा व तुम्ही व तुमचा मित्र यांच्यातील संवाद लिहा.

विद्यार्थ्यांसाठी सूचना

जागतिक पर्यावरणदिनानिमित्त
‘आनंदनिकेतन’ या वृक्षवाटिकेतर्फे

वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

इच्छुक विद्यार्थ्यांनी २५ एप्रिलपर्यंत वर्गशिक्षकांकडे आपली नावे नोंदवावीत व ५ जूनला सकाळी ७.३० ला शाळेत जमावे.

टीप:- येताना उन्हाळी सुट्टीत जमवलेल्या फळबिया सोबत आणाव्यात.


प्रसंगलेखन-

खालील बातमी वाचा.

वरील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता. त्या भावपूर्ण प्रसंगाचे लेखन करा.


आत्मकथन-

खालील दिलेला महामार्गावरील सूचनाफलक तुमच्याशी बोलतो आहे, अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मकथन लिहा.

♦ वाहने हळू चालवा.
♦ पुढे एक किलोमीटरचा घाट आहे.
♦ गरज पडेल तेव्हा कर्णभोंगा वाजवा.
♦ गतिरोधकावर वाहनाची गती कमी करा.
♦ वाहन चालवतांना भ्रमणध्वनी बंद ठेवा.
♦ लक्षात ठेवा - ‘नाही पेक्षा उशीर बरा’.


खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा.


कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

 

 


गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या तुमच्या मित्राची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.


खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

कृती करा.


खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?


खाली दिलेल्या शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा.

शब्द - छत्री, रेनकोट, पाऊस


खालील बातमी वाचा.

वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


शब्दसमूह, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर करून उतारा तयार करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×