हिंदी

खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.

२६ जानेवारी, भारताचा गणतंत्र दिन. अर्णव स्वच्छ शालेय गणवेशात तयार होऊन शाळेत गेला. माननीय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु झाला. विद्यार्थ्यांनी ध्वजवंदन केले. राष्ट्रगीत, ध्वजगीत, देशभक्तीपर गीत सादर केले. अध्यक्षांच्या प्रेरणादायी भाषणानंतर अर्णवचे देशभक्तीचा संदेश देणारे व देशभक्ताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे भाषण झाले. वृक्षारोपण, खाऊवाटप झाल्यानंतर मुले घरी जायला निघाली.

अर्णवदेखील आपली तीनचाकी सायकल घेऊन निघाला. सावकाशपणे हुतात्मा चौकापर्यंत पोहोचला. लाल दिव्याचा संकेत मिळताच जागेवरच थांबला. चौकात खूप गर्दी होती. अनेक छोटी मुलं हातात छोटे तिरंगी झेंडे घेऊन पालकांच्या वाहनांवर बसली होती. हिरवा दिवा दिसताच थांबलेली गर्दी पुढे सरकली. अर्णवनेही हाताने चाकाला वेग दिला. एवढ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारं असं.....

  • तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या व तात्पर्य लिहा.  
  • तुम्ही कथा तयार करताना व लिहिताना कोण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या, त्यांची यादी करा.
संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

खरा गणतंत्र दिन

२६ जानेवारी, भारताचा गणतंत्र दिन. अर्णव स्वच्छ शालेय गणवेशात तयार होऊन शाळेत गेला. माननीय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु झाला. विद्यार्थ्यांनी ध्वजवंदन केले. राष्ट्रगीत, ध्वजगीत, देशभक्तीपर गीत सादर केले. अध्यक्षांच्या प्रेरणादायी भाषणानंतर अर्णवचे देशभक्तीचा संदेश देणारे व देशभक्ताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे भाषण झाले. वृक्षारोपण, खाऊवाटप झाल्यानंतर मुले घरी जायला निघाली.

अर्णवदेखील आपली तीनचाकी सायकल घेऊन निघाला. सावकाशपणे हुतात्मा चौकापर्यंत पोहोचला. लाल दिव्याचा संकेत मिळताच जागेवरच थांबला. चौकात खूप गर्दी होती. अनेक छोटी मुलं हातात छोटे तिरंगी झेंडे घेऊन पालकांच्या वाहनांवर बसली होती. हिरवा दिवा दिसताच थांबलेली गर्दी पुढे सरकली. अर्णवनेही हाताने चाकाला वेग दिला. एवढ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारं असं दृश्य दिसलं. चौकाच्या मध्यभागी काही मुलं जमलेल्या गर्दीशी काहीतरी बोलत होती. नंतर त्याच्या लक्षात आलं, की काही मुलं-मुली रस्त्यावर पडलेले तिरंगे वेचत होती आणि जमा करून चौकाकडे धाव घेत होती.

चौकाच्या मध्यभागी जमलेल्या गर्दीत जाऊन तो उभा राहिला. एक मुलगा गर्दीशी संवाद साधत होता, ’सायबांनो, तुमी असे नका न वागू! हा तिरंगा आपल्या देशाचा अभिमान हाये, त्याला असे रस्त्यावर नका ना भिरकावू. सकाळी उठून तिरंग्याला सलाम ठोकायचा नि घरी जाताना तोच कचऱ्यवानी कुटंभी फेकून द्यायाचा? आम्हांला तर तुमचीच लाज वाटून राहिली, म्हणून तुम्ही टाकलेले हे तिरंगे गोळा करून आम्ही गणतंत्र दिवस साजरा करत आहोत. आपल्या तिरंग्याचा अपमान न करनं हाच आमचा गणतंत्र दिन हाय,“ तो कळकळीने सांगत होता. थोड्याच वेळात त्याच्या शाळेतल्या मुलांनी याच विषयावर तिथे पथनाट्य सादर केले व सर्वांना देशाचा आदर करण्याची प्रतिज्ञा घ्यायला लावली. परिस्थितीशी झुंजत शिक्षण घेणाऱ्या त्या गरीब मुलांच्या या नव्या उपक्रमाने आज सर्व सुशिक्षितांचे डोळे उघडले होते. अर्णवला हा त्यांचा उपक्रम फार आवडला होता. या उपक्रमात सहभागी होण्याचा निर्धार करून तो घरी परतला.

तात्पर्य: राष्ट्राभिमान जपण्यासाठी राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान राखणे खूप महत्त्वाचे आहे.

  • रस्त्यावरची महत्त्वपूर्ण घटना, त्या गरीब मुलांचा नवा उपक्रम, त्यांची पथनाट्याची कल्पना, त्यांतून लोकांना मिळणारा संदेश, अर्णवचा सहभाग.
shaalaa.com
उपयोजित लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 16.3: उपयोजित लेखन - कथालेखन [पृष्ठ ६७]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 16.3 उपयोजित लेखन
कथालेखन | Q १. | पृष्ठ ६७

संबंधित प्रश्न

खालील निवेदन वाचा व संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.

महात्मा फुले विद्यालय बुलढाणा
आंतरशालेय नाट्यमहोत्सवातील स्पर्धांसाठी
एकपात्री प्रयोग कलाकारांची निवड
इच्छुक विद्यार्थ्यांकडून स्व-परिचयपत्र
मागविण्यात येत आहे.

नाट्यविभाग प्रमुख

अंतिम दिनांक दि.२६ डिसेंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक

 

स्वपरिचय पत्राचे मुद्दे

(१) संपूर्ण नाव          

(२) पत्ता                 

(३) संपर्क क्रमांक    

(४) जन्मतारीख        

(५) शैक्षणिक पात्रता/विशेष प्रशिक्षण

(६) छंद

(७) अनुभव/पारितोषिक

(८) इतर कलांमधील प्रावीण्


घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबाबत संबंधित व्यक्तिकडे तक्रार करा.


खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

(अ) चौकट पूर्ण करा.

(आ) जाहिरातीतील काही मजकूर चुकीचा वाटतो का? सकारण नमूद करा.

(इ) वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?


खालील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरुपात पुनर्लेखन करा.


खाली दिलेल्या बातमीच्या मथळ्यावरून आकर्षक जाहिरात तयार करा.

‘पाठ्यपुस्तकेतर पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील.’


दिलेल्या सूचना वाचा व तुम्ही व तुमचा मित्र यांच्यातील संवाद लिहा.

विद्यार्थ्यांसाठी सूचना

जागतिक पर्यावरणदिनानिमित्त
‘आनंदनिकेतन’ या वृक्षवाटिकेतर्फे

वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

इच्छुक विद्यार्थ्यांनी २५ एप्रिलपर्यंत वर्गशिक्षकांकडे आपली नावे नोंदवावीत व ५ जूनला सकाळी ७.३० ला शाळेत जमावे.

टीप:- येताना उन्हाळी सुट्टीत जमवलेल्या फळबिया सोबत आणाव्यात.


प्रसंगलेखन-

खालील बातमी वाचा.

वरील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता. त्या भावपूर्ण प्रसंगाचे लेखन करा.


आत्मकथन-

खालील दिलेला महामार्गावरील सूचनाफलक तुमच्याशी बोलतो आहे, अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मकथन लिहा.

♦ वाहने हळू चालवा.
♦ पुढे एक किलोमीटरचा घाट आहे.
♦ गरज पडेल तेव्हा कर्णभोंगा वाजवा.
♦ गतिरोधकावर वाहनाची गती कमी करा.
♦ वाहन चालवतांना भ्रमणध्वनी बंद ठेवा.
♦ लक्षात ठेवा - ‘नाही पेक्षा उशीर बरा’.


खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा.


कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

 

 


खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

कृती करा.


खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

शब्दजाल पूर्ण करा.


खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?


खालील बातमी वाचा.

वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


शब्दसमूह, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर करून उतारा तयार करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×