Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा.

Advertisements
उत्तर
भ्रमणध्वनी नसते तर...!
'आईने मोबाइल विकत घेऊन दिला नाही, म्हणून मुलाने आत्महत्या केली' ही वर्तमानपत्रातील बातमी वाचताना मनात विचार आला, की भ्रमणध्वनी नसता तर.....?
खरंच, भ्रमणध्वनी नसता, तर त्याच्या हट्टापायी मुलांना जीव गमवावा लागला नसता. मुले ब्लू व्हेलसारख्या गेम्सच्या आहारी जाऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली नसती. भ्रमणध्वनी हातात नसताना वाढणारी मानसिक अस्वस्थता, चिडचिड कमी झाली असती.
तंत्रज्ञानाने दुरावलेली माणसं प्रत्यक्षात भेटू लागली असती व प्रत्यक्षपणे आपल्या आनंदाचे, दु:खाचे, भाव-भावनांचे आदानप्रदान झाले असते. सातत्याने मोबाइलमध्ये गुंतलेली बच्चेकंपनी मैदानात खेळताना, पळताना , प्रसंगी पडताना व त्यातून उठतानाही दिसली असती. वाढदिवस व्हॉट्सअँपवर नाही, तर प्रत्यक्ष घरी जाऊन साजरे झाले असते. आंतरजालाचा दुरुपयोग कमी झाला असता व त्यातून समाजविघातक प्रवृत्तींना आळा बसला असता.
पण..... भ्रमणध्वनी नसता, तर संपर्काचे माध्यम तुटले असते हे खरे. गरजेच्या वेळी हा भ्रमणध्वनीच देवासारखा धावून येतो. अडचणीत असलेल्या माणसांना भ्रमणध्वनीमुळे त्या संकटातून बाहेर येता आल्याची अनेक उदाहरणे आहेत. महत्त्वाच्या निरोपांचे आदानप्रदान या संपर्कमाध्यमातूनच शक्य होते. आज या मोबाइलमुळे हवी ती माहिती काही सेकंदांमध्ये आपल्यासमोर हजर होते. औद्योगिक जगतात अनेक वेळा मोबाइल कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाच्या सभा घेऊन उद्योगासंबंधी निर्णय घेतले जातात. भ्रमणध्वनीशिवाय हे सर्व कसं शक्य झालं असतं?
आपण गेम कसे खेळलो असतो? गणिते सोडवताना झटपट आकडेमोड कशी झाली असती? इंटरनेट नसते, तर मनोरंजनाचे कार्यक्रम बंद झाले असते. मग व्हॉट्सअँप, फेसबुक, ट्विटर, ऑर्कुट सारं काही बंद. अरे देवा, मग आयुष्यात काही मजाच राहिली नसती.
त्यामुळे, भ्रमणध्वनी नसणं ही कल्पना या काळात करणं अवघडच आहे; पण त्याच्या वापराच्या बाबतीत चांगल्या सवयी लावून घेतल्यास ते या पिढीला मिळालेले वरदानच ठरेल हे निश्चित!
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील निवेदन वाचा व संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.
|
महात्मा फुले विद्यालय बुलढाणा नाट्यविभाग प्रमुख अंतिम दिनांक दि.२६ डिसेंबर |
|
पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक |
|
स्वपरिचय पत्राचे मुद्दे (१) संपूर्ण नाव (२) पत्ता (३) संपर्क क्रमांक (४) जन्मतारीख (५) शैक्षणिक पात्रता/विशेष प्रशिक्षण (६) छंद (७) अनुभव/पारितोषिक (८) इतर कलांमधील प्रावीण् |

घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबाबत संबंधित व्यक्तिकडे तक्रार करा.
खालील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरुपात पुनर्लेखन करा.

खाली दिलेल्या बातमीच्या मथळ्यावरून आकर्षक जाहिरात तयार करा.
‘पाठ्यपुस्तकेतर पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील.’
|
¤ स्वच्छता अभियान कार्यक्रम ¤ २ ऑक्टोबर आष्टी जि. चंद्रपूर येथील शारदा विद्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न झाला. या दिवशीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जयंत करोडे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापकांनी भूषवले. इयत्ता आठवी ते दहावी साठी ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धाआयोजित केली होती. अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी परिसरात ‘स्वच्छता अभियान’ राबवले. प्रमुख पाहुण्यांनी ‘माझी शरीर स्वच्छता आणि आहार’ या विषयावर उत्तम उद्बोधन केले. प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे देण्यात आली. अध्यक्षीय भाषणानंतर श्री. गावंडे सरांनी आभारप्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. |
वरील वृत्तांत वाचा व त्यासाठीची कृती तयार करा.
प्रसंगलेखन-
खालील बातमी वाचा.

वरील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता. त्या भावपूर्ण प्रसंगाचे लेखन करा.
आत्मकथन-
खालील दिलेला महामार्गावरील सूचनाफलक तुमच्याशी बोलतो आहे, अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मकथन लिहा.
|
♦ वाहने हळू चालवा. |
कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या तुमच्या मित्राची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

कृती करा.

खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?
खालील बातमी वाचा.

वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
शब्दसमूह, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर करून उतारा तयार करा.
