मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

 

 

लेखन कौशल्य
Advertisements

उत्तर

कंदील: फार दिवसांनी भेट झाली आपली! कशी आहेस तू?
विजेरी: मी बरी आहे. पण तू इथे काय करतोस? तुझी आता गरज उरली नाही.
कंदील:  असे का म्हणतेस? तुझे नि माझे एकच तर कार्य आहे. स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देणे.
विजेरी:  ते ठीक आहे. पण तू अगदी जुनापुराणा झालास. तुला पेटवताना किती कष्ट पडतात. मी पाहा, एक बटन दाबले की लांबवर झोत पडतो.
कंदील:  हो. पण तुझा प्रकाश डोळ्यांना त्रास देतो. मी अगदी मंद तेवतो!
विजेरी:  तू तर उगाचच मिणमिणतोस. माझ्या प्रकाशाचा झगमगाट तर बघ. कशी लखलखते मी!
कंदील:  अग, तुला सेल लागतात पेटवायला. ते गेले की तुझा खेळ समाप्त! मी तर अखंड तेवत राहतो.
विजेरी:  तुलाही तेल लागतंच की! तेल घाला, वात ठेवा. ती भिजवा. तेव्हा कुठे तू पेटतोस!
कंदील:  माझ्याकडे तेल आहे. खरंच! तेलाला स्नेह म्हणतात. फार प्राचीन काळापासून माझा व माणसांचा स्नेहबंध आहे.
विजेरी:  हो. पण काळ बदलला. आता तुझी गरज नाही.
कंदील:  असे म्हणू नकोस! प्रकाश देणे आपले व्रत आहे. आपल्या दोघांचेही कार्य एकच आहे. आपल्या कार्याचा विसर पडू देता कामा नये! 
विजेरी:
 “तुमचं म्हणणं अगदी पटलं मला. खरं तर मी तंत्रज्ञानामुळे वेगाने धावू शकते, पण तुमच्यात जो ‘स्नेह’ आणि संयम आहे, तो माझ्याकडे नाही. मी फक्त समोरच्याला रस्ता दाखवते, पण तुम्ही संपूर्ण परिसर उजळून टाकता.”
shaalaa.com
उपयोजित लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: वस्तू - संवादलेखन [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 6 वस्तू
संवादलेखन | Q (१) | पृष्ठ २३

संबंधित प्रश्‍न

खालील निवेदन वाचा व संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.

महात्मा फुले विद्यालय बुलढाणा
आंतरशालेय नाट्यमहोत्सवातील स्पर्धांसाठी
एकपात्री प्रयोग कलाकारांची निवड
इच्छुक विद्यार्थ्यांकडून स्व-परिचयपत्र
मागविण्यात येत आहे.

नाट्यविभाग प्रमुख

अंतिम दिनांक दि.२६ डिसेंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक

 

स्वपरिचय पत्राचे मुद्दे

(१) संपूर्ण नाव          

(२) पत्ता                 

(३) संपर्क क्रमांक    

(४) जन्मतारीख        

(५) शैक्षणिक पात्रता/विशेष प्रशिक्षण

(६) छंद

(७) अनुभव/पारितोषिक

(८) इतर कलांमधील प्रावीण्


कार्यक्रमाची तिकिटे संपल्यामुळे हाच कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची मागणी करणारे पत्र लिहा.


घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबाबत संबंधित व्यक्तिकडे तक्रार करा.


खालील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरुपात पुनर्लेखन करा.


खाली दिलेल्या बातमीच्या मथळ्यावरून आकर्षक जाहिरात तयार करा.

‘पाठ्यपुस्तकेतर पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील.’


दिलेल्या सूचना वाचा व तुम्ही व तुमचा मित्र यांच्यातील संवाद लिहा.

विद्यार्थ्यांसाठी सूचना

जागतिक पर्यावरणदिनानिमित्त
‘आनंदनिकेतन’ या वृक्षवाटिकेतर्फे

वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

इच्छुक विद्यार्थ्यांनी २५ एप्रिलपर्यंत वर्गशिक्षकांकडे आपली नावे नोंदवावीत व ५ जूनला सकाळी ७.३० ला शाळेत जमावे.

टीप:- येताना उन्हाळी सुट्टीत जमवलेल्या फळबिया सोबत आणाव्यात.


गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या तुमच्या मित्राची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.


खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

कृती करा.


खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

शब्दजाल पूर्ण करा.


खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?


खाली दिलेल्या शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा.

शब्द - छत्री, रेनकोट, पाऊस


खालील बातमी वाचा.

वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


शब्दसमूह, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर करून उतारा तयार करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×