English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

खालील निवेदन वाचून बातमी तयार करा: साने गुरुजी विदद्यालय, सोलापूर भव्य वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न दि.: 13 जानेवारी वेळ: सकाळी 8 वाजता प्रमुख पाहुणे : मा. सौ. अपर्णा भोसले

Advertisements
Advertisements

Question

खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:

Writing Skills
Advertisements

Solution

जनमानस

सानेगुरुजी विद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव संपन्न

सोलापूर, १४ जानेवारी २०२०: काल दिनांक १३ जानेवारी रोजी सानेगुरुजी विद्यालय, सोलापूर आयोजित वार्षिक क्रिडा महोत्सव पार पडला. या क्रिडा महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. रोहित बर्वे हे होते, तर सुप्रसिद्ध धावपटू मा. सौ. अपर्णा भोसले या महोत्सवात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

           सानेगुरुजी विद्यालयातील इयत्ता ५ वी ते इयत्ता ९ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी या क्रिडा महोत्सवात भाग घेतला होता. सकाळी ८ वाजता क्रिडा महोत्सवाची सुरुवात झाली. कबड्डी, खो-खो, लंगडी, गोळाफेक, धावण्याची शर्यत यांसारख्या पारंपरिक खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे बास्केटबॉल, फुटबॉल असे पाश्चिमात्य खेळांच्या स्पर्धाही झाल्या. खेळासोबत शिस्त व लयबद्ध पद्धतीने कवायत प्रकार, मल्लखांब प्रकार तसेच लेझीम नृत्य यांसारखे क्रिडा साहित्यावर आधारित नृत्यप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले.

           त्यानंतर क्रिडा महोत्सवाचे अध्यक्ष मा. श्री. रोहित बर्वे आणि प्रमुख पाहुण्या मा. सौ. अपर्णा भोसले यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. 'मानवाच्या आयुष्यातील खेळाचे महत्त्व' या विषयावर मा. सौ. अपर्णा भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रगीताने क्रिडा-महोत्सवाची सांगता करण्यात आली.

shaalaa.com
बातमी लेखन
  Is there an error in this question or solution?
2019-2020 (March) Official

RELATED QUESTIONS

खालील शीर्षकावरून बातमी तयार करा.

शाळेत वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम, वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न.

खालील विषयावर बातमी तयार करा.

रेल्वे प्रवासात प्रवासी नागरिकांजवळ स्वओळखपत्र असणे अनिवार्य. (आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड यांपैकी कोणतेही एक.)


पुढील विषयावर बातमी तयार करा.

जनता गर्ल्स हायस्कूल, शेंदूरजना घाट येथे “जागतिक महिला दिन” साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा.


पुढील समारंभाची बातमी तयार करा.

शाळेच्या सुवर्णमहोत्सवाचा उद्घाटन समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


दिलेल्या शब्दांवरून बातमी तयार करा.

शाळा ______ कोरोना ______ मोबाइल ______ शिक्षण सुरू ______ अभ्यासक्रम ______समस्या.


पुढील घटनेवर आधारित बातमी तयार करा.

कोरोना आला नी _____ गाव स्वच्छ झाले.


पुढील शीर्षकावरून बातमी तयार करा.

बालिका दिननिमित्त, “बेटी बचाओ! बेटी पढाओ!” या उपक्रमास जिल्ह्यातील अनेक शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:

अभिनव विद्यालय, नागपूर
‘भव्य विज्ञान प्रदर्शन’ संपन्न.
दि. 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर
वेळ स. 11 ते सं. 5 वाजेपर्यंत
अध्यक्ष - श्री. सुहास माने
प्रमुख पाहुणे - श्री. आशिष वाघ

  • एकूण 50 शाळांचा सहभाग
  • उद्घाटन सोहळा संपन्न
  • उत्कृष्ट प्रकल्पांना पारितोषिके
  • विज्ञान नाटिका सादर

वृद्ध दिनानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

आदर्श विद्यालय

रवीनगर, गडचिरोली

‘विज्ञानदिन सोहळा’

विज्ञानदिनानिमित्त

वैज्ञानिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन

उद्घाटक - डॉ. श्री. विजय आफळे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख

सिटी कॉलेज, गडचिरोली

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली.

विज्ञानदिनानिमित्त आयोजित प्रदर्शन सोहळ्याची बातमी करून लिहा.


तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा.


खालील विषयावर बातमी तयार करा.

8 मार्च ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ शाळेत ‘माता-पालक मेळावा’ व विविध स्पर्धांचे आयोजन पालकांचा उदंड प्रतिसाद.


खालील विषयावर बातमी तयार करा.

तलाव ओसंडून वाहू लागले. गावकऱ्यांसाठी आनंदवार्ता.


खालील विषयावर बातमी तयार करा.

शहरात डेंग्यूचा वाढता फैलाव म. न. पा. कडून आरोग्य तपासणी.


खालील विषयावर बातमी तयार करा.

सचिन तेंडुलकरचा वाढदिवस युवा हेल्थ क्लबकडून उत्साहात साजरा.


खालील विषयावर बातमी तयार करा:

जनता विद्यालय, शिरवळ येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा.

प्रमुख पाहुणे - ज्येष्ठ साहित्यिक - श्री. अरविंद मोरे

अध्यक्ष - श्री. सागर शिंदे

दि. 27 फेब्रुवारी वेळ - स. 10.00


खालील विषयावर बातमी तयार करा:

अभिनव विद्यालय, सोलापूर
शालांत परीक्षेस बसलेल्या विदयार्थ्यांसाठी
'शुभेच्छा समारंभ'

दि. 25 फेब्रुवारी,  वेळ - ११:०० वा.

अध्यक्ष : मां. श्री. विजय जोशी

प्रमुख पाहुणे - मां. श्री. विशाल साठे (समाजसेवक)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×