Advertisements
Advertisements
Question
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
निरीक्षण पद्धत
Short/Brief Note
Advertisements
Solution
मानवी वर्तनाच्या ज्या पैलूंचा प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करून अभ्यास करणे शक्य नसते, अशा पैलूंचा अभ्यास करण्यासाठी निरीक्षण पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते. निरीक्षण पद्धतीत नैसर्गिक परिस्थितीत किंवा नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाचा हेतुपूर्वक अभ्यास केला जातो. नैसर्गिक परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नैसर्गिक निरीक्षण म्हणतात. नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नियंत्रित निरीक्षण म्हणतात.
बालमानसशास्त्रज्ञ, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, सामाजिक मानसशास्त्रज्ञ निरीक्षण पध्दतीचा मोठ्या प्रमाणावार वापर करतात. सुस्पष्ट हेतूने व सुनियोजित पद्धतीने वापर केला असता, निरीक्षण पद्धत ही शास्त्रोक्त संशोधन पद्धत मानता येते.
shaalaa.com
मानसशास्त्राच्या अभ्यासपद्धती
Is there an error in this question or solution?
