Advertisements
Advertisements
Question
एक व्यक्ती एका निश्चित पगार आणि दरवर्षी ठरावीक वेतनवाढ या अटींवर नोकरी सुरू करते. 4 वर्षांनी त्या व्यक्तीचा पगार रुपये 15000 आणि 10 वर्षांनी पगार रुपये 18000 असल्यास त्या व्यक्तीचा मूळ पगार आणि वेतनवाढ काढा.
Advertisements
Solution
समजा, निश्चित पगार ₹ x आणि दरवर्षी वेतनवाढ ₹ y आहे.
तर, 4 वर्षांनी पगार = x + 4y
10 वर्षांनी पगार = x + 10y
पहिल्या अटीनुसार,
4 वर्षांनी त्या व्यक्तीचा पगार रुपये 15,000 आहे.
∴ x + 4y = 15000 …(i)
दुसऱ्या अटीनुसार,
10 वर्षांनी त्या व्यक्तीचा पगार रुपये 18,000 आहे.
∴ x + 10y = 18000 …(ii)
समीकरण (ii) मधून (i) वजा करून,
x + 10y = 18000
x + 4y = 15000
- - -
6y = 3000
∴ y = `3000/6 = 500`
y = 500 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,
x + 4(500) = 15000
∴ x + 2000 = 15000
∴ x = 13000
∴ त्या व्यक्तीचा मूळ पगार 13,000 रुपये आहे, तर दरवर्षी ठरावीक वेतनवाढ 500 रुपये आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
दोन संख्यांमधील फरक ३ असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज १९ आहे, तर त्या संख्या शोधा.
कृती पूर्ण करा.

एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले, तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, तर तो अपूर्णांक काढा.
10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये A आणि B अशा दोन विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. जर A प्रकारच्या 150 पेट्या व B प्रकारच्या 100 पेट्या भरल्या, तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. जर A प्रकारच्या 260 पेट्या भरल्या, तर तो ट्रक त्याच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास B प्रकारच्या 40 पेट्या लागतात, तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती?
विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने, तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किमी/तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासांत पूर्ण केला असेल, तर विशालने बसने किती किमी प्रवास केला?
मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजची वये काढा.
समीकरण 3x - 2y = 17 मध्ये (i) y = -1 असताना x ची किंमत शोधा. (ii) x = 3 असताना y ची किंमत काढा.
एका अंकगणिती श्रेढीसाठी t17 = 54 आणि t9 = 30 असल्यास प्रथम पद (a) आणि सामान्य फरक (d) काढा.
सोडवा. 0.4x + 0.3y = 1.7; 0.7x – 0.2y = 0.8.
कोणतीही दोन एकसामयिक समीकरणे लिहा- ज्यामध्ये चलांच्या किमती 12 आणि 10 असतील.
