Advertisements
Advertisements
Question
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.
ब्रह्मी युद्धाची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा:
मुद्दे:
(अ) पहिले ब्रह्मी युद्ध
(ब) दुसरे ब्रह्मी युद्ध
(क) तिसरे ब्रह्मी युद्ध
Very Long Answer
Advertisements
Solution
(अ) पहिले ब्रह्मी युद्ध:
- म्यानमारमधील नैसर्गिक संपत्ती आणि बाजारपेठेची उपलब्धता यांमुळे त्या देशावर कब्जा मिळवणे हा इंग्रजांचा हेतू होता.
- म्यानमारच्या राजवंशाने आपल्या अधिपत्याखाली देशाचे यशस्वीरीत्या एकत्रीकरण केले होते. त्यांनी मणिपूरही जिंकून घेतले. त्यानंतर त्यांनी आसामवर आक्रमण केले.
- इंग्रजांच्या दृष्टीनेही धोक्याची घंटा होती. पुढे भारताचा गव्हर्नर लॉर्ड ॲम्हर्स्ट याने म्यानमार विरुद्ध युद्ध पुकारले. ते दोन वर्षे चालले. ते पहिले ‘ब्रह्मी युद्ध’ म्हणून ओळखलेजाते. या युद्धात इंग्रजांच्या आरमाराने रंगून (याँगॉन) बंदर जिंकून घेतले. त्यानंतर इंग्रज आणि म्यानमारचे राज्यकर्ते यांच्यात तह झाला. या तहान्वये म्यानमारकडून इंग्रजांनी मणिपूर परत घेतले. तसेच म्यानमारचा किनारी प्रदेश आणि तेथील जंगल व खनिज संपत्ती इंग्रजांच्या ताब्यात आले.
- इंग्रजांनी म्यानमारकडून लष्करी भरपाई म्हणून मोठी रक्कम वसूल केली. म्यानमारची तत्कालीन राजधानी ॲव्हा येथे इंग्रज रेसिडेंट नेमण्यात आला.
(ब) दुसरे ब्रह्मी युद्ध:
- ‘दुसरे ब्रह्मी युद्ध’ लॉर्ड डलहौसीच्या काळात लढले गेले.
- म्यानमारमध्ये राहणाऱ्या दोन इंग्रज नागरिकांना म्यानमार प्रशासनाने दंड ठोठावला. डलहौसीला हस्तक्षेप करण्याचे जणू कारणच मिळाले.
- डलहौसीनेजॉर्ज लॅम्बर्ट या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली फौजा पाठवून युद्ध पुकारले.
- ब्रह्मी सैन्याचा पराभव केला. रंगून (याँगॉन), पेगू (बेगो), प्रोम ही ठिकाणे इंग्रजांनी जिंकून घेतली. पेगूचा प्रदेश इंग्रजांनी त्यांच्या साम्राज्यात विलीन केला. या विजयामुळे इंग्रजांचा म्यानमारच्या किनाऱ्यावरील प्रभाव वाढला.
(क) तिसरे ब्रह्मी युद्ध:
- म्यानमारचा राजा थिबा याने इटली व जर्मनी या देशांशी व्यापारी करार करण्याचा प्रयत्न केला. त्याने फ्रान्सशी व्यापारी करार केला. अशातच थिबा राजाने ‘बॉम्बे-बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन’ या ब्रिटिश व्यापारी संस्थेला दंड ठोठावला.
- भारताचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन यांनी या संधीचा फायदा घेतला आणि ब्रह्मदेशावर हल्ला करण्यासाठी सैन्य पाठवले.
- ‘तिसरे ब्रह्मी युद्ध’ १८८५ च्या सुमारास झाले. या युद्धात इंग्रजांनी मंडाले हे शहर जिंकले. थिबा राजा इंग्रजांना शरण आला आणि उत्तर म्यानमार इंग्रज साम्राज्याचा भाग बनले.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
